शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ठरतोय सिकलसेलचा ‘हॉटस्पॉट’; तब्बल ९९ रुग्ण, ७०६ वाहक सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:34 IST

५० लाखांच्या निधीने सिकलसेल मोहिमेला 'बूस्ट'; ७ लाख नागरिकांची तपासणी पूर्ण; सिल्लोड आणि कन्नडमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक.

- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर : सिकलसेल तपासणी किट खरेदीसाठी केवळ जिल्ह्याला मिळालेला ५० लाखांचा निधी फलदायी ठरला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली असता, तब्बल ४२ नवे रुग्ण आणि १८३ नवे वाहक आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९ रुग्ण आणि ७०६ वाहक सक्रिय असल्याचे निदान झाले असून, सिकलसेल विरोधातील लढ्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे.

जिल्ह्यात १५ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने संशयित नागरिकांची रक्त तपासणी करण्याची ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया’ मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ५.५० लाख नागरिकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, रक्त तपासणीसाठी आवश्यक किट नसल्यामुळे आरोग्य विभागाने शासनाकडे ५० लाखांच्या निधीची मागणी केल्यानंतर तो मिळाला. त्या निधीतून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गरजेनुसार किट खरेदीच्या सूचना दिल्या. त्या किटद्वारे ४ लाख ६० हजार रक्त तपासण्या केल्या. निधी प्राप्त होण्यापूर्वी २.५ लाख नागरिकांची तपासणी झाली होती. १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत तेव्हा ५ नवीन रुग्ण व ३२ वाहक आढळले होते. तर ही मोहीम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात ५२ रुग्ण आणि ४९१ वाहक होते. असे एकूण ५७ रुग्ण व ५२३ वाहक आढळून आले होते.

आदिवासीबहुल भागात रुग्णसंख्याप्रामुख्याने आदिवासीबहुल भागात रुग्ण, वाहक संख्या मोठी आहे. यात सिल्लोडमध्ये वाहक १६९, रुग्ण ३०, कन्नडमध्ये वाहक २२८, रुग्ण २५, सोयगावमध्ये वाहक ९६, रुग्ण १२, संभाजीनगरमध्ये वाहक ४९, रुग्ण १३, खुलताबादेत वाहक १५, रुग्ण ३, फुलंब्रीत वाहक २५, रुग्ण ०१, गंगापूरमध्ये वाहक ०९, रुग्ण ०७, पैठणमध्ये वाहक ५२, रुग्ण ०३, वैजापूरमध्ये वाहक ६३, रुग्ण ५ आहेत.

५० लाखांचा निधी फलद्रुप ठरलाप्रारंभी या मोहिमेला किटअभावाचा फटका बसला; मात्र शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर होताच मोहिमेला नवसंजीवनी मिळाली. तालुकास्तरावर किट खरेदीला वेग आल्याने तपासण्यांचा आकडा वाढला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे ४ लाख ६० हजार नागरिकांच्या रक्त तपासण्या झाल्या. आता प्रत्येक ‘पीएचसी’कडे १०-१५ किट शिल्लक आहेत.- डॉ. अभय धानोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar District: Sickle Cell Hotspot; 99 Patients, 706 Carriers Active

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's sickle cell screening reveals 42 new patients and 183 carriers. A ₹50 lakh fund boosted testing, identifying 99 patients and 706 carriers. Tribal areas show higher prevalence, with ongoing efforts to combat the disease.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य