शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे..!

By admin | Updated: May 11, 2015 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. सर्वाधिक कर्मचारी वर्ग असलेल्या शिक्षण विभागामध्ये मोठी लगबग सुरू आहे

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. सर्वाधिक कर्मचारी वर्ग असलेल्या शिक्षण विभागामध्ये मोठी लगबग सुरू आहे. यंदा जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नाहीत. मात्र, विनंतीनुसार बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील अंदाजे ४०० वर कर्मचारी विनंती बदलीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे तालुकास्तरावर विनंती आणि प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदअंतर्गत सर्वाधिक कर्मचारी हे शिक्षण विभागात आहेत. तब्बल पाच ते साडेपाच हजार शिक्षक आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेलाही तितकाच वेळ लागतो. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाकडून मागील आठ ते दहा दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. तेव्हापासूनच बदल्यांचे वारण अधिक गतीमान झाले आहे. यंदा जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नाहीत. त्यामुळे केवळ विनंतीनुसार बदल्या केल्या जाणार आहेत. त्याही ५ टक्के. असे असले तरी इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे. तब्बल चारशेवर शिक्षकांनी विनंती बदली हवी आहे, असे शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून पात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरील प्रक्रिया वेळेत व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने काही कर्मचाऱ्यांना सुटीचेही बोलावून कामे करून घेतली जात आहेत. इच्छुकांची संख्या ४०० वर असली तरी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेवेळी योग्य शाळा न मिळाल्यास ही संख्या कमी होवू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नसल्या तरी तालुकास्तरावर मात्र दोन्ही प्रकारच्या बदल्या होणार आहेत. प्रशासकीय १० टक्के तर विनंतीनुसार ५ टक्के बदल्या केल्या जाणार आहेत. या माध्यमातूनही सुमारे साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या होवू शकतात, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)