शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भरती परीक्षेवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By admin | Updated: July 6, 2014 00:21 IST

बीड: वाहनचालक व शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

बीड: वाहनचालक व शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अस्थापनेवरील विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत शिपाई व वाहनचालक पदांसाठी लेखी परीक्षा रविवारी घेण्यात येत आहे. लेखी परीक्षेदरम्यान ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे त्याच्याऐवजी दुसराच विद्यार्थी परीक्षेला बसतो, परीक्षा सुरू असताना अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रामध्ये जातात. परीक्षा सुरू असताना मोबाईलसह इतर उपकरणांचा उपयोग करून गैरप्रकार केला जातो आदी तक्रारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आल्या होत्या. अशा प्रकारांना आळा बसावा व गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, यासाठी परीक्षेदरम्यान पंधरापेक्षा अधिक सीसीटीव्हींची नजर बारा केंद्रावर राहणार आहे. शहरातील चंपावती माध्यमिक विद्यालय, भगवान माध्यमिक विद्यालय व गीता कन्या प्रशाला येथे वाहनचालक पदासाठी परीक्षा होणार आहे. येथे १ हजार ७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शहरातील मिलिया महाविद्यालय, संस्कार विद्यालय, गुरूकुल इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, बलभीम महाविद्यालय, द्वारकादास मंत्री विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय, स्वा. सावरकर विद्यालय व डॉ. बापूजी साळुंखे माध्यमिक विद्यालय येथे शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत.या केंद्रांवर २ हजार ७१६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई वाहन चालक व शिपाई संवर्गातील पदांसाठी तीन हजार ७९५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. यापूर्वी परीक्षांबाबत तक्रारी येत असत. मात्र यावेळी परीक्षेदरम्यान कोणी काही गैरकृत्य करताना आढळून आल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अशांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.