शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गौताळ्यात १४ मे रोजी प्राणीगणना

By admin | Updated: May 8, 2014 00:25 IST

कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांची गणना दि. १४ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार असून, वन्यजीव विभागाच्या वतीने त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

 कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांची गणना दि. १४ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार असून, वन्यजीव विभागाच्या वतीने त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. गौताळा अभयारण्य हे जळगाव व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेंवर २६० चौ.कि.मी. क्षेत्रफळावर नैसर्गिक वनराईने नटलेले आहे. अभयारण्याचा भाग डोंगराळ आहे. या नैसर्गिक अभयारण्यात बिबटे, अस्वल, कोल्हा, लांडगा, नीलगाय, सायाळ, हरीण, ससा, माकड आदी प्राणी आहेत. या प्राण्यांची मोजदाद बुद्ध पौर्णिमेच्या रात्री करण्यात येते. बुद्ध पौर्णिमा ही मे महिन्यात येते. या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्राणी २४ तासांतून किमान एक ते दोन वेळा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे निरीक्षण मनोरे अथवा मचाणावर बसून प्राण्यांची मोजदाद करता येते. गौताळा औट्रम घाट परिक्षेत्रात ३२ नैसर्गिक, तर ३० कृत्रिम पाणवठे आहेत. बहुतांशी पाणवठ्याजवळ निरीक्षण मनोरे बांधण्यात आलेले आहेत, तर काही पाणवठ्यांजवळ झाडांवर मचाण बांधण्याचे काम सुरू आहे. कन्नड, नागद व चाळीसगाव वन परिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व वनमजूर मिळून १०० कर्मचारी प्राणी गणनेत सहभागी होणार आहेत. या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण मंगळवारी चाळीसगाव वन परिक्षेत्रात संपन्न झाले. वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त निसर्गप्रेमीही प्राणी गणनेत सहभाग घेऊ शकणार आहेत; मात्र त्यासाठी दि. १३ मेपूर्वी वन्यजीव विभागाकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करणार्‍या निसर्गप्रेमीने पासपोर्ट साईजचे दोन फोटो देणे आवश्यक आहे. प्राणीगणनेसाठी येणार्‍या निसर्गप्रेमीस ओळखपत्र देण्यात येणार असून, ओळखपत्राव्यतिरिक्त बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कुणासही अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अभयारण्यात पाणवठ्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही पाण्याची उपलब्धता असल्याने प्राणीगणनेत तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरीही प्राणीगणनेच्या तयारीसाठी वन्यजीव विभागाकडून सर्व दक्षता घेण्यात येत आहे. (वार्ताहर)