शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर आज बुलडोझर !

By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते.

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणेने या आदेशाची अंमलबजावणी करीत शहरातील सुमारे २०० वर अतिक्रमणधारकांच्या प्रतिष्ठानांवर नोटिस डकवून अतिक्रण काढण्याबाबत सूचित केले आहे. या उपरही ज्यांनी अतिक्रमणे हटविली नाहीत, त्या अतिक्रमणांवर प्रशासन सोमवारी बुलडोजर फिरविणार आहे. उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या औैरंगाबाद-सोलापूर या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी विशेषत: जिल्हाधिकारी कार्याल, जिल्हा परिषद, बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. मागील दोत ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी शहरांसोतबत ग्रामणी भागातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर पालिका, तहसील प्रशासन, बांधकाम विभागाला आदेश दिले होते. उस्मानाबाद शहरामध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. औैरंगाबाद-सोलापूर या मार्गावरील अतिक्रमणांवर प्रशासनाच्या वतीने नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. सदरील अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, असे सदरील नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जे अतिक्रमणधारक या नोटिसीचे पालन करणार नाहीत, त्यांचे अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणार आहे. सदरील अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा सर्व खर्च हा ‘त्या’ अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाईल, असे प्रशासनाने दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. रस्ते होणार मोकळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्याल त्यानंतर बसस्थानकासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे विशेषत: बसस्थानकासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. मात्र, सोमवारी ही सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याने औरंगाबाद-सोलापूर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. (प्रतिनिधी) पोलिस बंदोबस्त अतिक्रमण हटविताना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीसमोर झेरॉक्स सेंटर, पान टपरी, चहाचे गाडे, फळ विक्रेते आदी प्रकारची लहान-लहान दुकाने आहेत. हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे. असे असतानाही या अतिक्रमणधारकांकडून काही दिवस नगर परिषद तर काही दिवस संबंधित कंत्राटदाराने प्रतिदिन १० ते १५ रूपये इतका कर वसूल केला आहे. सदरील रस्ता जर बांधकाम विभागाचा असेल तर पालिका प्रशासन कोणत्या आधारावर या लोकांकडून कर वसूल करते, असा सवाल येथील अतिक्रमण धारकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या अतिक्रमणधारकांनी ‘त्या’ पावत्या जवळ ठेवल्या आहेत. पावत्यांवर ‘आठवडी ‘बाजर/दैैनंदिन बाजार’ असे नमूद केले आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचेही अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे. स्वत:हून अतिक्रमणे काढली बांधकाम विभागाच्या नोटिसा मिळाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण हटविली. तर काही जणांनी सदरील नोटिसीकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता अशा अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोझर फिरणार आहे. त्याचप्रमाणे अतिक्रणम काढण्यासाठी येणारा खर्चही त्या-त्या व्यक्तीकडून घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बंद दुकानांवर डकविल्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा देण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे ‘त्या’ नोटिसा सर्वसंबंधितांना देता आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणांवरच नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. ही सर्व अतिक्रमणे सोमवारी काढण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.