शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांच्या आॅडिटला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:01 IST

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांच्या आॅडिटला ब्रेक लागला आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांच्या आॅडिटला ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हे काम काढून घेऊन ते जिल्हा परिषद पातळीवर देण्यात आल्यामुळे कोणत्या जिल्ह्यांत किती योजना सुरू आहेत, किती बंद आहेत, त्यावर किती खर्च झालेला आहे, हे सगळे गुलदस्त्यात आहे.शहरी व ग्रामीण भागात राबविलेल्या पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट करून त्या योजनांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठवाड्यातील १० हजार ६८५ पाणीपुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आॅडिट केले जाणार होते; परंतु ते काम प्राधिकरणाकडून काढून घेऊन जि.प.कडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या ३५ वर्षांपासून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट होणार होते. यामध्ये जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचा समावेश होता. पाणी योजनांचे आॅडिट करताना वितरण व्यवस्था, योजनांची दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण, वीज बिल आदींची तपासणी करण्यात येणार होती. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक गावांत २ ते ३ योजना राबविण्यात येऊनही नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या योजना डबघाईस आल्या आहेत. काही पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. या उन्हाळ्यातच महावितरणने २ हजार योजनांचा वीजपुरवठा वीज बिलासाठी कापला होता.ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गाव, वाड्या योजनांचा आढावा, शिल्लक निधी, ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील पाणीपुरवठा योजना, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, उपांगांची कामे न झालेल्या योजना, जिल्ह्यातील एकूण पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट, बंद योजना, स्वतंत्र नळ योजना, ग्रामीण नळ योजना, अपहार झालेल्या योजनांप्रकरणी केलेली कार्यवाही, विजेअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी विभागीय बैठक झाली. विभागातील पाणीपुरवठा योजनांबाबत स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अव्वर सचिव श्यामलाल गोयल यांना विचारले असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. त्यांच्याकडे विभागातील ग्रामीण पाणीपुरवठ्याची कुठलीही माहिती नव्हती.