शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

लिपिक महिलेकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 21:39 IST

लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणा-या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्याा सुमारास रंगेहात पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ नखाते यांच्या कक्षात करण्यात आली.

औरंगाबाद: लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणा-या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्याा सुमारास रंगेहात पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ नखाते यांच्या कक्षात करण्यात आली.
विनोद फुलचंद गंगवाल (५७,रा. मारवाडी गल्ली, वाळूज)आणि अरूण दगडू माडूकर(५४,रा. जालाननगर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचे वडिल २० वर्षापूर्वी अपघातात मरण पावले. यानंतर ती आरटीओ कार्यालयात लिपिकपदी नोकरीला लागली. आरोपी विनोद  हा आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करतो तर अरूण हा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. शिवाय त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांनी तीन महिन्यापूर्वी तक्रारदार महिलेची भेट घेतली आणि आम्ही तुमच्यासंबंधी अनेक महत्वाची कागदपत्रे आमच्या हाती लागली आहे. त्या कागदपत्राच्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुझी नोकरी जाऊ शकते, अशी थेट धमकीच त्यांनी दिली.  तुला नोकरी टिकवायची असेल तर आम्हाला दोन लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे ते म्हणाले.  सुरुवातीला काही दिवस त्यांच्या म्हणण्याकडे तक्रारदार यांनी दुर्लक्ष केले. मात्र गेल्या काही दिवसापासून पैसे देता अथवा तुमची तक्रार करू,अशा प्रकारे ते तक्रारदार यांना  ब्लॅकमेल करीत होते. एवढी रक्कम एकदाच देणे शक्य नसेल तर दोन टप्प्यात द्या, असे त्यांनी सांगितले. आरोपींच्या धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या तक्रारदार यांनी शेवटी गुन्हेशाखेकडे धाव घेतली.  पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे , सहायक आयुक्त रामेश्वर थोरात,निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक उप निरीक्षक नंदकुमार भंडारे, पोहेकॉ संतोष सोनवणे, फारूख देशमुख, विजयानंद गवळी, बनकर, पंडित, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, लालखा पठाण, धर्मराज गायकवाड, नंदलाल चव्हाण, नवाब शेख, वीरेश बने, रेखा चांदे यांनी गुरूवारी दुपारी आरटीओ कार्यालय परिसरात सापळा रचला.  यावेळी आरोपी विनोद आणि अरूण यांनी तक्रारदार महिलेच्या कार्यालयात जाऊन लिपिक महिलेकडून  खंडणीचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेतले. यानंतर खंडणीच्या रक्कमेसह  गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.