शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाचा लिपिक पकडला रंगेहाथ

By admin | Updated: July 5, 2014 01:03 IST

औरंगाबाद : बस भाड्यासाठी पैसे नाहीत म्हणून सिडको बसस्थानकाहून बोर्डापर्यंत पायी गेलेल्या गरीब विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

औरंगाबाद : बस भाड्यासाठी पैसे नाहीत म्हणून सिडको बसस्थानकाहून बोर्डापर्यंत पायी गेलेल्या गरीब विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातील (बोर्ड) लिपिकाला चांगलेच महागात पडले. दहावीच्या मार्कमेमोमध्ये नावात झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी या गरीब विद्यार्थ्याकडून पाचशे रुपये घेताना बोर्डातील या लिपिकाला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. शेषराव शामराव पडोळ (५१, रा. अष्टविनायकनगर, सातारा परिसर), असे त्या लिपिकाचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील किरण भगवान ढाकणे हा विद्यार्थी नुकताच दहावी उत्तीर्ण झाला. त्याच्या मार्कमेमोमध्ये ‘किरण भगवान ढाकणे’ऐवजी ‘किरण भगवानराव ढाकणे,’ असे छापून आले होते. वडिलांच्या नावापुढे ‘राव’ लागल्याने प्रवेशासाठी अडचण येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर नावातील ही दुरुस्ती करून घेण्यासाठी किरण हा त्याचा मामा संदीप सानप (रा. चणेगाव, बदनापूर) यांच्यासह गुरुवारी औरंगाबादेत आला. या मामा-भाच्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सिडको बसस्थानकावर ते उतरले. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे बस किंवा रिक्षाने जाण्याऐवजी हे मामा-भाचे बसस्थानकापासून बोर्ड कार्यालयापर्यंत पायी गेले. मार्कमेमोतील दुरुस्तीचे काम तेथील कनिष्ठ लिपिक शेषराव पडोळकडे होते. या दोघांनी पडोळची भेट घेतली. तेव्हा त्याने हे काम सोपे नाही. ते फुकटात होत नसते, असे म्हणत दुरुस्ती करून देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. उद्या पैसे घेऊन या आणि मार्कमेमोत दुरुस्ती करून देतो, असे पडोळ म्हणाला. दोघांनी आपली आर्थिक अडचण सांगितली; पैसे आणले तरच मार्कमेमो दुरुस्त करून देतो, असे तो म्हणाला. अशा स्थितीत आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या पडोळला धडा शिकविण्याचा मामा-भाच्याने निर्र्णय घेतला आणि बोर्ड कार्यालयातून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला. तेथे पडोळविरुद्ध तक्रार दिली.