शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर उद्योगांसाठी काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:03 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी मराठवाडा आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीत व्यक्त केली. हा हल्ला म्हणजे उद्योगांसाठी काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. हल्ला होत असताना पोलीस निष्क्रिय राहिल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

ठळक मुद्देवाळूज औद्योगिक वसाहतीत तोडफोड प्रकरण : उद्योजकांकडून चिंता; उद्योगांसाठी काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी मराठवाडा आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीत व्यक्त केली. हा हल्ला म्हणजे उद्योगांसाठी काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. हल्ला होत असताना पोलीस निष्क्रिय राहिल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

बंददरम्यान सुमारे १०० पेक्षाही अधिक कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीमुळे वाळूज महानगरातील औद्योगिक परिसर हादरला आहे. आर्थिक नुकसान आणि उद्योजकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण यासंदर्भात मराठवाडा उद्योजक संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला सीएमआयएचे राम भोगले यांनी घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचे सांगून हातात लाठ्या-काठ्या घेऊन दारू पिलेल्या तरुणांच्या जमावाने तोडफोड केल्याचे सांगितले. या हल्ल्यात कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.मसिआचे अध्यक्ष किशोर राठी म्हणाले की, कारखान्यांसाठी हा काळा दिवस आहे. औरंगाबादला पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराचे नाव खराब होईल, अशी कृती कुणी करू नये. आपणही गप्प बसून चालणार नाही.बैठकीत उद्योजकांनी तोडफोडीच्या घटनेचा निषेध करून अनेक सूचना मांडल्या.सुनील किर्दक : या परिसरातील पोलीस ठाणी ही कारखान्यांसाठी आहेत. मात्र पोलीस कारखान्यांसाठी केवळ पाच टक्केच काम करतात. पोलिसांनी कारखान्यांसाठीच १०० टक्के काम करण्याची मागणी केली पाहिजे. कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असल्याने त्यांनी कारखान्याशी कायम संपर्कात राहिले पाहिजे, असे राठी म्हणाले.सुनील देशपांडे : प्रत्येकाने कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत.रोहित दाशरथी : तोडफोड झालेल्या कारखान्याची दुरुस्ती कोण करणार. त्यांची नुकसानभरपाई कशी मिळणार.अनिल साळवे : कारखान्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असतील तर स्मार्ट सिटी कशी होणार. पोलिसांनी हल्ले होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.सौरभ भोगले : आता राजकीय पुढाऱ्यांना विचारणा केली पाहिजे की महाराष्ट्राला कुठे घेऊन जायचे आहे.गिरीधर कुमार : आंदोलकांनी तोडफोड करून कंपन्या लुटल्या आहेत.अनिल कोरडे : परदेशी व्यक्तींना काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार.मोहिनी केळकर : वाळूज औद्योगिक परिसरात भक्कम प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा हवी.श्रीकांत मुंदडा : या घटनेच्या निषेधार्थ महिनाभर कारखाने बंद ठेवावेत.बंदमधून उद्योग वगळण्याची मागणीबैठकीत बहुतांशी उद्योजकांनी औरंगाबादला पुढे न्यायचे असेल तर बंद आंदोलन काळात कारखाने वगळण्यात यावे. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशा सूचना मांडल्या. यासंदर्भात सर्व उद्योजक संघटनांची लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. बैठकीला उमेश दाशरथी, किशोर राठी, रवींद्र वैद्य, एन. श्रीराम, मकरंद देशपांडे आदींसह तीनशेपेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती होती.जागतिक पातळीवर चुकीचा संदेशवाळूज औद्योगिकनगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यांवर हल्ले करून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. या भागात अनेक बड्या देशी-विदेशी कंपन्या आहेत. तोडफोडीमुळे जागतिक पातळीवर गेलेला चुकीचा संदेश भविष्यात येणाºया नवीन उद्योगांवर मर्यादा घालणारा आहे. अशा घटना घडत असतील तर वाळूज आद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे येणार नाहीत, याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षण