घंटी वाजली; शाळा गजबजल्या

By Admin | Updated: June 17, 2014 00:39 IST2014-06-17T00:23:58+5:302014-06-17T00:39:15+5:30

कळमनुरी : तालुक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळांना १६ जून पासून सुरूवात झाली. दीड ते दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर पुन्हा शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या.

The bell rang; School garnished | घंटी वाजली; शाळा गजबजल्या

घंटी वाजली; शाळा गजबजल्या

कळमनुरी : तालुक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळांना १६ जून पासून सुरूवात झाली. दीड ते दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर पुन्हा शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन वर्गात गेल्याचा व मित्रांना बऱ्याच दिवसांपासून भेटल्यानंतरचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पाऊस न पडल्याने गर्मीने विद्यार्थी घामघूम झाले होते. असे असतानाही नवीन वर्गात गेल्याचा विद्यार्थ्यांना आनंद होत होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व शाळेचे पटांगण विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते. असोलवाडीच्या शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी १६ जून रोजी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तुळशीराम बेले, सुभाष असोले, मुख्याध्यापक सी.सी. खिल्लारे, पी.एन. पडोळे, राजाराम डवरे, एम.एन. शेळके, एम.के. मल्लेवार, श्याम पौळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
जनजागृती रॅली
कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने गावामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीत ‘ मुला-मुलींना शाळेत पाठवा’ असे विद्यार्थीनी नारे दिले.
या रॅलीमध्ये केंद्र प्रमुख वैरागड, मुख्याध्यापक भालेराव, महाले, विसावे, नवघरे, भादुंर्गे, बोरकर, स्वामी यांच्यासह शिक्षिका महाले व सर्व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: The bell rang; School garnished