शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुखना धरण परिसरात आले परदेशी पाहुणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:35 IST

कल्पाच्या परिसरात परदेशी पक्ष्यांसह भारतातील विविध पक्षी मुक्कामी आढळून आले आहेत.

ठळक मुद्देसुखना धरण शहरापासून २२ कि.मी अतंरावर बार हेडेड, फ्लेमिंगो चक्रवाक, ब्लॅक स्टोर्क चा संचार

औरंगाबाद : शहरापासून २२ कि.मी. अंतरावरील सुखना मध्यम प्रकल्पात परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. प्रकल्पाच्या परिसरात परदेशी पक्ष्यांसह भारतातील विविध पक्षी मुक्कामी आढळून आले आहेत.

निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या वतीने आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी उत्सव कार्यक्रमांतर्गत स्थानिक, तसेच प्रवासी पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. सुखना जलाशयात  शुक्रवारी आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणात पक्षी मित्र किशोर गठडी, केदार चौधरी, नागेश देशपांडे, मोहन शिखरे आदी सहभागी झाले होते. सुखना प्रकल्पात दरवर्षी निसर्ग मित्रमंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या जातात. यावर्षी बार हेडेड, फ्लेमिंगो चक्रवाक, ब्लॅक स्टोर्क  यांचे आगमन झाले आहे. यावर्षी प्रथमच काही प्रवासी पक्षी लवकर आल्याचे आढळून आले, तर काही पक्षी प्रथमच काही वर्षांच्या अंतराने आल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले.

या पक्ष्यांचा संचारसुखना मध्यम प्रकल्पात रोहित (अग्निपंख), चक्रवाक, चमचा (दर्विमुख), काळा करकोचा, पट्टकादंब (पट्टेरी राजहंस), राखी बदक, तलवार बदक, वेडा राघू, कुरव पक्षी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, खंड्या, काष्ठ खाटिक, कोतवाल, नदीसुरय, राखी बगळा, कापशी घार, गप्पीदास, ठिपक्यांचा होला, शेकाट्या, पिवळा धोबी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, मोठ्या वटवट्या या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

१. रंगीत करकोचा

२. काळा करकोचा

३. करकोचा

४.कोतवाल

५. वेडा राघू

६. कपाशी घार

७ . फ्लेमिंगो :

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरणNatureनिसर्ग