अंबाजोगाईत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By Admin | Updated: December 16, 2014 01:06 IST2014-12-16T00:31:29+5:302014-12-16T01:06:43+5:30

अंबाजोगाई : अनाधिकृत नळ जोडण्या बंद कराव्यात या मागणीसाठी एका तरुणाने मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला

The attempt of the youth to autobiography in Ambajogai | अंबाजोगाईत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

अंबाजोगाईत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न


अंबाजोगाई : अनाधिकृत नळ जोडण्या बंद कराव्यात या मागणीसाठी एका तरुणाने मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली.
सचिन दत्तात्रय गायकवाड (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे तरूणाचे नाव आहे. क्रांतीनगर परिसरातील अनाधिकृत नळ जोडण्या बंद कराव्यात या मागणीसाठी त्याने चार दिवसापूर्वी सीओ रामनिवास झंवर यांना निवेदन दिले होते. मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्याने सीओ झंवर यांच्या दालनात घुसून अंगावर रॉकेल ओतले. पेटवून घेणार इतक्यात त्याच्या हातातील काडीपेटी कर्मचाऱ्याने हिसकावून घेतली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The attempt of the youth to autobiography in Ambajogai