शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न; पाच आरोपींना सक्त मजुरी

By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST

जालना : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखारात शेंडगे, सखाराम गंगाधर शेंडगे, गोविंद अर्जुन शेंडगे व नारायण गंगाधर शेंडगे या पाच आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

जालना : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखारात शेंडगे, सखाराम गंगाधर शेंडगे, गोविंद अर्जुन शेंडगे व नारायण गंगाधर शेंडगे या पाच आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. देशमुख यांनी दिला आहे. या आरोपींपैकी अर्जुन शेंडगे, ज्ञानेश्वर शेंडगे व सखाराम शेंडगे यांना चार वर्षे सक्तमजुरी व गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून एक वर्षे शिक्षा तसेच आरोपी गोविंद शेंडगे व नारायण शेंडगे यांना प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी रत्नमाला अनिल शर्मा (वय ३५ वर्षे रा.ढाकलगाव ता.अंबड ) यांनी फिर्यादी दिली की, १२ सप्टेंबर २०११ रोजी रत्नामाला ही त्यांच्या शेतात गट नंबर १८७ मध्ये काम करीत होती, त्यांच्या सोबत त्यांचे पती अनिल शर्मा, व मनोज जगताप व संतोष हजर होते. आमच्या शेतातील मोसंबी तोडू नका या कारणावरून आरोपी गोविंद अर्जुन शेंडगे, अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखाराम शेंडगे, नारायण गंगाधर शेंडगे व सखाराम गंगाधर शेंडगे यांनी फिर्यादीस व साक्षीदारांना शिवीगाळ केली व साक्षीदारांना लाकडी दांड्याने मारहाण केली व आरोपी सखाराम याने रत्नमालास हिस ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या तोंडात विषारी द्रव टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी विरूध्द गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन वरीलप्रमाणे निर्णय देण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)