शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावामध्ये सर्वपक्षीय निदर्शने

By admin | Updated: July 6, 2014 00:21 IST

माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना त्रास दिला जात आहे.

माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना त्रास दिला जात आहे. येथील कर्मचारी विविध कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तसेच अर्वाच्च भाषाही वापरतात. या सेतू केंद्रातील मनमानी कारभाराला कंटाळून शनिवारी सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. शहरातून काढलेल्या मोर्चाने शहर दणाणून गेले होते.येथील तहसीलमधील सेतू सुविधा केंद्र हे सर्वसामान्यांसाठी असुविधा केंद्र बनले आहे. तेथे दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. विविध प्रमाणपत्रांकरिता १०० ते १००० रुपये सर्वसामान्यांना मोजावे लागत आहेत. जो पैसा देईल त्यास तत्काळ प्रमाणपत्र दिले जाते. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने पैसे देण्यास टाळाटाळ केली अथवा नकार दिल्यास येथील दलाल व कर्मचारी त्यांना नियम सांगून प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब करतात.येथे काम करणारे कर्मचारीही विद्यार्थ्यांना उद्धट बोलून त्यांच्यावर धावून जाण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. शुक्रवारी माकपचे शिवाजी कुऱ्हे हे एका सर्वसामान्य व्यक्तीला प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्रात घेऊन गेले होते. तेथील कर्मचारी सय्यद जावेद व त्यांच्या सहकार्यांनी आलेल्या सर्वसामान्य व्यक्तीसह कुऱ्हे यांच्याशी उद्धट वर्तन केले. येथील सेतू सुविधा केंद्रात नेहमीच सर्वसामान्यांना अशी वागणूक दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात होता. शुक्रवारी हा अनुभव कुऱ्हे यांना आल्यानंतर त्यांनी याची माहिती सर्वांना दिली. नंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय नेते शिवाजी चौकात एकत्र आले. त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.या मोर्चामध्ये दयानंद स्वामी, डॉ. भगवान सरवदे, विलास जावळे, शिवाजी कुऱ्हे, तुकाराम येवले, गोरख टाकणखार, नारायण होके, राजेंद्र होके, मोहन जाधव, अजय सोळंके, राजेश घोडे, विष्णुदास करवा, अ‍ॅड. डाके, सय्यद रज्जाक, शेख अहमद, मनोज फर्के, शिवमूर्ती कुंभार, राकेश जाधव, नाना भिसे, ज्योतीराम पांढरपोटे, विलास नेमाने, अभिजीत कोंबडे, बाळासाहेब डुकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांनी मोर्चात सहभाग घेतला होता.तहसील कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अरुण जराड यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर विचार करण्यात येईल, असे जराड म्हणाले. (वार्ताहर)