शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Gautala Sanctuary : तब्बल २४० कि.मी.चा प्रवास करून आलेला 'तो' पट्टेदार वाघ गौताळ्यात रमलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:17 IST

Tiger in Gautala Autramghat Sanctuary यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव असा सुमारे २४० कि.मी.चा प्रवास करीत पट्टेदार वाघ फेब्रुवारीत गौताळा अभयारण्यात दाखल झाला.

ठळक मुद्देवन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ टिपला जात आहे. वाघ ८-१० दिवसाला वेगवेगळ्या भागात फिरतो.

औरंगाबाद : तब्बल २४० कि.मी.चा प्रवास करीत यवतमाळ जिल्ह्यातून आलेला पट्टेदार वाघ गौताळा अभयारण्यात चांगलाच रमला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव असा सुमारे २४० कि.मी.चा प्रवास करीत पट्टेदार वाघ फेब्रुवारीत गौताळा अभयारण्यात दाखल झाला.

वन विभागाने गौताळा अभयारण्यात पाच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. पैकी एका कॅमेऱ्यात १५ मार्च रोजी तो टिपला गेल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दिली. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ टिपला जात आहे. डॉ. पाठक यांच्यासह वन्यजीवप्रेमी मिलिंद गिरधारी, वसीम कादरी तसेच वनसेवक रमेश घुगे यांनी रविवारी वाघाच्या शोधार्थ मोहीम राबविली. जामदरा, चंदन नाला, गौतम ऋषी आश्रम परिसर, सीता न्हाणी या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा, विष्ठा आढळून आली. जामदरा येथे वाघाने शिकार केलेली मृत नीलगाय सुध्दा आढळून आली.

अडीच महिन्यांपासून रमला..विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विजय सातपुते म्हणाले की, वाघ ८-१० दिवसाला वेगवेगळ्या भागात फिरतो. गौताळ्यात पोषक वातावरण दिसल्याने तो अडीच महिन्यांपासून येथे रमला आहे. गौताळ्यात नीलगाय, रानडुकरे मोठ्या प्रमाणात आहे. लपण्यासाठी गवत आहे. गेल्या वर्षी ४५ आणि यावर्षी ७० पाणवठे तयार केल्याने पाण्याची उपलब्धता आहे. मोठ्या प्रमाणात शिकार मिळते. हे समृद्ध जंगल असल्याने वाघाला सुरक्षित वाटले असावे.

टॅग्स :TigerवाघforestजंगलAurangabadऔरंगाबाद