छाननीत उमेदवारांचे पस्तीस अर्ज बाद
By Admin | Updated: September 30, 2014 01:25 IST2014-09-30T00:11:57+5:302014-09-30T01:25:42+5:30
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सोमवारी चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.

छाननीत उमेदवारांचे पस्तीस अर्ज बाद
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सोमवारी चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. छाननी दरम्यान उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील ३५ नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून, उर्वरित ३ अवैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे परंडा-भूम-वाशी मतदार संघातील २३ पैकी ५ नामनिर्देशनपत्र लढाईपूर्वीच ‘आऊट’ झाले आहेत. तर १८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. उमरगा-लोहारा या मतदार संघातून ९ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर २४ उमेदवारी अर्ज वैध ठरले. तुळजापूर विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ३१ नामनिर्देशनपत्र वैध ठरले. चार मतदार संघातून एकूण ३५ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. तर १०८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. १ आॅक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेनंतरच मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उमरगा : उमरगा विधानसभा मतदार संघातून ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी सोमवारी करण्यात आली. त्यानुसार ९ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून उर्वरित ३५ अर्ज वैध ठरले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र गुरव यांनी दिली.
वैध अर्ज ठरलेल्यांमध्ये कैलास चिंतामणराव शिंदे (भाजप), किसन नागनाथ कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), संजय आत्माराम गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दत्ता लक्ष्मण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), ज्ञानराज धोंडीराम चौगुले (शिवसेना), विजय मारूती क्षीरसागर (मनसे), चंद्रकांत ईश्वर थोरात (भारतीय नवजवान सेना/पक्ष), प्रज्ञावर्धन भगवान कांबळे (नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी), विद्या आबाराव वाघमारे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया) याशिवाय अपक्ष उमेदवारांमध्ये हरिश माधवराव डावरे, विलास शरणाप्पा व्हटकर, उमाजी पांडूरंग गायकवाड, राजू उर्फ राजेंद्र बळीराम उबाळे, रावसाहेब श्रीरंग सरवदे, जितेंद्र उर्फ जितेश लक्ष्मण चौगुले, राम सईदा गायकवाड, प्रा. पांडुरंग शंकरराव पोळे, सुनिल वामनराव सूर्यवंशी, दिलीप साहेबराव तेलंग, ईश्वर मल्हारी क्षीरसागर, सतीश ज्ञानोबा सरवदे, बालाजी एकनाथ कोनाळे, तानाजी वैजनाथ गायकवाड आणि लक्ष्मण तुकाराम कांबळे यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
उस्मानाबाद : उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या तिघांचे अर्ज सोमवारी झालेल्या छाननीत बाद झाले़ तर ३५ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत़ नामनिर्देशन पत्रावर घेण्यात येणाऱ्या अक्षेपामुळे होणार गोंधळ मात्र, यावेळी पहावयास मिळाला नाही़
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघासाठी दाखल अर्जांची सोमवारी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात छाननी करण्यात आली़ यावेळी तिघांचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात आले़ तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, बहुजन समाज पार्टीचे अॅड़ जयराम बळीराम घुले, भारतीय जनता पार्टीचे संजय त्र्यंबकराव दूधगावकर-पाटील, शिवसेनेचे ओमप्रकाश भूपालसिंह राजेनिंबाळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजयकुमार आत्माराम यादव, नोंदणीकृत राजकीय पक्षात आॅल इंडिया मजलीस ए़ इतेहादुल मुस्लीमीन चे अकबरखान गुलाबखान पठाण, रिपब्लिकन सेनेचे अनिल उत्तमराव हजारे, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेश भिवाजी भालेराव, हिंदूस्थान जनता पार्टीचे बाबू विठोबा चव्हाण, हिंदूस्थान निर्माण दलाचे धनंजय मुरलीधर तर्कसे-पाटील, आंबेडराईट पार्टी आॅफ इंडियाचे मधुकर गायकवाड, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे डॉ़ रमेश सुब्बराव बनसोडे तर अपक्षांमध्ये अर्चना राणाजगजितसिंह पाटील, अनंत जगन्नाथ चोंदे, राजाभाऊ उर्फ राजेंद्र ओव्हाळ, केरबा विठ्ठल गाढवे, किरण दिगंबर टेकाळे, बालाजी बापूरव तुपसुंदरे, फेरोज चाँदसाब तांबोळी, धनंजय दिनकराव पाटील, सुशिलकुमार विनायक पाडुळे, पांडुरंग गणपतराव भोसले, प्रदीप सिद्राम जाधव, भिमा शंकर जाधव, रजिओद्दीन आरेफोद्दीन सिद्दीकी, प्रा़ पोपट ग्यानबा रणदिवे, रामजीवन पंढरी बोंदर, संजयकुमार भागवत वाघमारे, अॅड़ वाजेद सलीम शेख, शिवाजी दिगंबर उर्फ पांडूरंग कापसे, सय्यद समीर रशीद, स्मिता अभय शहापूरकर, हाजीभाई हन्नुरे, ज्ञानदेव गोविंदाराव हौसलमल या ३५ जणांचे नामनिर्देशनपत्र मंजूर करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
भूम : परंडा विधानसभा मतदार संघासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांच्भ् छाननी झाली. यावेळी २३ पैकी ५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणूक विभाग कार्यालयात सकाळी ११ ते १ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी संतोष राऊत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे, चेतन पाटील यांच्या उपस्थितीत अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ५ उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाले. तर उर्वरित १८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये संगीता बालाजी आगवाने (बहुजन समाज पार्टी), गणेश दत्तात्रय शेंडगे (मनसे), नुरोद्दीन चौधरी (काँग्रेस), ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील (शिवसेना), राहुल महारुद्र मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस), बाळासाहेब भगवंतराव पाटील (रासप), राजगुरु त्रिंबक कुकडे महाराज (हिंदुस्थान जनता पार्टी) तर अपक्षांमध्ये अमेय बाळासाहेब पाटील, आर्यनराजे किसनराव शिंदे, अॅड. प्रबुद्ध साहेबराव अहिरे, बजरंग साहेबराव ताटे, संजयकुमार कोंडीबा बनसोडे, गोरख चांगदेव भोरे, अमीर छगन मुलाणी, वैशाली राहुल मोटे, संभाजी नानासाहेब शिंदे, सूर्यकांत चंद्रकांत कांबळे, अ. करीम म. इसूफ हावरे यांचा समावेश आहे. छाननी प्रक्रियेवेळी आ. राहुल मोटे, दत्ता साळुंके, अॅड. गुळवे व अॅड. नुरोद्दीन चौधरी, रोहन जाधव, गणेश शेंडगे, गोरख भोरे आदी उमेदवार सूचक, अनुमोदक हजर होते. (वार्ताहर)
तुळजापूर : २४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी २९ रोजी सकाळी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व ६९ नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यावेळी १४ उमेदवारांचे १८ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
काही उमेदवारी अर्जावर प्रस्तावक सूचकांचे नाव व सह्या नसल्यामुळे तर काही उमेदवारांनी अर्जासोबत राजकीय पक्षाचे प्रमाणपत्र न जोडल्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. उर्वरित ३१ उमेदवारांचे ५१ उमेदवारी वैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी बी. एस. घुगे यांनी दिली. यामध्ये जीवनराव विश्वनाथ गोरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), मधुकरराव देवराव चव्हाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रेमानंद बळवंतराव डोरनाळीकर (बहुजन समाज पार्टी), देवानंद साहेबराव रोचकरी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संजय प्रकाश निंबाळकर (भारतीय जनता पार्टी), सुधीर केशवराव पाटील (शिवसेना), सतीश श्रीपती कसबे (महाराष्ट्र विकास आघाडी), राहुल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी) तर अपक्ष उमेदवारात अतुल नागनाथ जवान, अशोक हरिदास जगदाळे, नागनाथ दशरथ उपळेकर, किरण जाधव, डॉ. गोविंद विश्वनाथ कोकाटे, कृष्णा देवानंद रोचकरी, खतीब तन्वीर अली सय्यद अली, गणेश रामचंद्र सोनटक्के, सुचेता जीवनराव गोरे, पिंटू पांडूरंग चांदणे, कानिफनाथ दुल्हा देवकुळे, बालाजी प्रभाकर पवार, महानंदा गजानन पैलवान, महेंंद्र भानुदास धुरगुडे, नामदेव धर्मा राठोड, संतोष लिंबाजी राठोड, अॅड. रामेश्वर धोंडीबा शेटे, संजय सुरेश रेणुके, विजय सुधाकर शिंगाडे, अॅड. विजयकुमार दिनकर नकाते, सुबरबाई शिवाजी राठोड, सत्यवान नागनाथ सुरवसे, संतोष ज्ञानोबा केंदळे यांचा समावेश आहे. छाननी अर्जानंतर केंद्रीय निवडणूक निरीक्षक डी. के. मिश्रा यांनी निवडणूक कार्यालयास भेट दिली. या भेटीत वैध व अवैध उमेदवारी अर्जाची तपासणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. घुगे, के. एच. पाटील, राजकुमार माने, एन. एस. भोसीकर, प्रा. व्ही. आर. कागदे व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)