छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरातील गांधेली शिवारात शहरातील एका गंभीर वकिलाचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळला. बुधवारी (दि.१५) रात्री ११ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मिथुन भास्कर (४९, रा. बीड बायपास) असे मृत वकिलाचे नाव असून प्राथमिक पाहणीत ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
गांधेली शिवारात एक गंभीर जखमी अवस्थेत व्यक्ती पडल्याची माहिती बुधवारी रात्री ११ वाजता पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक भारत पाचोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मिथुन यांच्या कुटुंबाला देखील याबाबत माहिती मिळाली होती. मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. प्राथमिक तपासणीत ही हत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रात्री उशिरा सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे, भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दारूच्या बाटल्या सापडल्यारस्त्यापासून जवळपास १५० मीटर आत झाडाझुडपात रक्त आढळले. जवळपास अनेक आक्षेपार्ह वस्तू, दारूच्या बाटल्या सापडल्या. रक्तबंबाळ अवस्थेत ते जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन कोसळल्याचा अंदाज आहे.
उत्तम क्रिकेटपटू व्यवसायाने वकील असलेले मिथुन उत्तम क्रिकेटपटू होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच वकिली क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. घाटीतील डॉक्टरांच्या माहितीनुसार, मिथुन यांच्य कंबरेखाली काही जखमा आहेत.
Web Summary : A lawyer, Mithun Bhaskar, was found dead in Chhatrapati Sambhajinagar. Police suspect murder after finding him injured near Beed Bypass. The discovery caused shock in the legal community. Injuries and liquor bottles were found at the scene.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में वकील मिथुन भास्कर मृत पाए गए। पुलिस को हत्या का संदेह है, क्योंकि वह बीड़ बाईपास के पास घायल अवस्था में मिले थे। इस खोज से कानूनी समुदाय में सदमा है। घटनास्थल पर चोटें और शराब की बोतलें मिलीं।