शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दोन कृषी विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

जालना : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जि.प.च्या कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून दोन दिवसांमध्ये दोन विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जालना : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जि.प.च्या कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून दोन दिवसांमध्ये दोन विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.कापूस उत्पादक म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. यावषी बीटी कपाशीचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची फारशी ओरड नव्हती. तथापि पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्या परिस्थितीत होत्या. मागील आठवडाभरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरेदीची लगबग सुरू झाली. युरियाची बाजारात उपलब्धता होऊनही हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांना काही विक्री केंद्र जादा भावाने युरीया खत विकत असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकास सापळे रचून कारवाया करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मोहीम अधिकारी पी.एस. पवार, जिल्हा कृषी अधिकारी ए.ए. सोनवणे, कोकाटे यांच्या भरारी पथकाने हसनाबाद ता. भोकरदन येथील न्यू मराठवाडा कृषी सेवा केंद्रावर छापा मारला, तेव्हा केंद्रचालक जादा दराने कृषी निविष्ठा देताना आढळून आला. तर मंगळवारी वाटुरफाटा येथील प्रगत कृषी सेवा केंद्रावर असाच प्रकार आढळून आला. संबंधित कृषी केंद्र चालकांविरूद्ध परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना आवाहनजिल्ह्यात कुठल्याही कृषी निविष्ठा विक्रेता बियाणे वा खताची जादा दराने विक्री करीत असेल तर कृषी विभागास कळवावे, असे आवाहन कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे, कृषी अधिकारी गंजेवार यांनी केले.