शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:26 IST

जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले. आता त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले. यात प्राथमिक १७ आणि माध्यमिकच्या १६ शाळांचा समावेश आहे. उर्वरित विनाअनुदानित शाळांची माहिती चुकून डेटामध्ये आल्याची माहिती शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली.

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी खूप कर्मचारी लागतात. त्यामुळे विविध सरकारी कार्यालये, अनुदानित खासगी शाळा, अनुदानित खासगी महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक विभागाकडे वर्ग करण्यात येतात. त्यानुसार विभागांकडून शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. परंतु, ती माहिती प्रशासनाला ३३ शाळांकडून मिळाली नाही.

...तर शाळांचे अनुदान बंदची शिफारसनिवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या सर्व शाळा खासगी आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे अधिकार संस्थाचालकांना आहेत. त्यामुळे ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याबाबत शिक्षण विभागाकडून संस्थाचालकांना सूचना देण्यात येणार आहेत. संस्थाचालकांनी तशी कार्यवाही केली नाही तर त्या शाळेचे अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण सचिवांकडे केली जाईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर