मनपाच्या ११३ वॉर्डांचे ५७ प्रभाग निश्चित
By Admin | Updated: August 23, 2014 00:49 IST2014-08-23T00:39:29+5:302014-08-23T00:49:13+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका प्रभागानुसारच होणार असून ११३ वॉर्डांचे ५७ प्रभाग करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे.

मनपाच्या ११३ वॉर्डांचे ५७ प्रभाग निश्चित
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका प्रभागानुसारच होणार असून ११३ वॉर्डांचे ५७ प्रभाग करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. गुन्हेगारीमुक्त राजकारण हा प्रभाग रचनेमागचा मूळ उद्देश आहे.
वॉर्डांची पुनर्रचना संपत आली असून ११ लाख ७५ हजार ११६ मतदारांचा आधार त्यासाठी घेतला आहे. विद्यमान वॉर्ड प्रभागात बदलणार असून, २० ते २२ हजार लोकसंख्येचा त्यात समावेश असेल. ११३ वॉर्डांतील ५७ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होणार असल्यामुळे पुढच्या वर्षी पालिकेवर महिलाराजचा पगडा असेल. उर्वरित ५६ वॉर्डांतून पुरुष उमेदवार आपले भाग्य अजमावतील. गटनिहाय लोकसंख्येच्या आधारानुसार प्रत्येक २ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉक आहे, असे १० ब्लॉक एका प्रभागात असतील. २०११ च्या जनगणनेनुसार १२ प्रभाग एस.सी., एस.टी.साठी आरक्षित होतील, असा अंदाज आहे. त्यात सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होतील. १२ प्रभाग म्हणजे २४ वॉर्ड होऊ शकतात. सध्या एस.सी.साठी १७ व एस.टी.साठी १ वॉर्ड आहे. म्हणजेच आणखी ६ वॉर्ड वाढू शकतात. नव्याने प्रभाग रचनेत ११३ वॉर्ड आहेत. एस.सी. प्रवर्गाची लोकसंख्या २ लाख २९ हजार २२३ आणि १५ हजार २४० एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या आहे. त्यात ६ लाख ९ हजार २०६ पुरुष आणि ५ लाख ६५ हजार ९१० महिलांचा समावेश आहे. एस.सी. लोकसंख्येत १ लाख १७ हजार ६८४ पुरुष आणि १ लाख ११ हजार ५३९ महिलांचा समावेश आहे.