राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी वेग आला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अनुदानित ११६ महाविद्यालयांतील ४६६ सहायक प्राध्यापकांच्या भरतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना बिंदूनामावली तपासून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच वेळी विद्यापीठातील ७३ पदांसाठी प्राप्त ३८०० अर्जांची छाननी सुरू केली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने प्राध्यापक उपलब्ध होतील.
राज्य शासनाने अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी ५ हजार १२ जागा भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार उच्चशिक्षण विभागाने जागांचे वाटप केले. त्यात उच्चशिक्षणच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत अनुदानित महाविद्यालयांत ४६६ जागा निघाल्या. त्या भरण्यासाठी विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांच्या चमूने सुरुवातीला महाविद्यालयांना रिक्त जागांचा तपशील कळविला. त्यानंतर पुन्हा विषयनिहाय रिक्त जागाही पाठविल्या तसेच कोणत्या विषयांच्या जागा भरायच्या, कोणत्या नाहीत याविषयी उच्च शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावर पुढचा टप्पा हा बिंदूनामावली तपासून घेण्याच्या संदर्भात आहे. विद्यापीठाने बिंदूनामावलीचे नियम आणि जागांचे आरक्षण यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही अनुदानित महाविद्यालयांना नुकतेच दिले. महाविद्यालयांनी बिंदूनामावली विद्यापीठाकडून तपासून घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अंतिम मंजुरी घेतल्यानंतर उच्चशिक्षण विभाग ना-हरकत प्रमाणपत्र देईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होऊन महाविद्यालये अर्ज मागवतील. अर्जांची छाननी करून संबंधित संस्था मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करतील. त्यासाठी जून-जुलैची मुदत ठरविल्याचे उच्चशिक्षण विभागाने स्पष्ट केले.
‘ओबीसी’चा उल्लेख नसल्याचा आक्षेपविद्यापीठाने महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीसाठी पाठविलेल्या बिंदूनामावलीच्या परिपत्रकात ‘ओबीसी’ प्रवर्गाचा उल्लेख नसल्याचा प्रकार अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. शासननिर्णयानुसार एकूण ११ आरक्षण प्रवर्ग असणे अनिवार्य असताना, विद्यापीठाच्या पत्रकात १० प्रवर्गांचाच उल्लेख आहे. यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी तपासणी करून सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दोन दिवस राखीव ठेवलेअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. उच्च शिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयांना भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राखीव ठेवले आहेत.-डॉ. पंकजा वाघमारे, सहसंचालक, उच्च शिक्षण
Web Summary : Recruitment for 466 assistant professors in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University colleges gains momentum. The university is scrutinizing 3800 applications for 73 posts, aiming to fill vacancies before the new academic year. Colleges are verifying point rosters for reservations, streamlining the hiring process.
Web Summary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के कॉलेजों में 466 सहायक प्रोफेसरों की भर्ती में तेज़ी आई है। विश्वविद्यालय 73 पदों के लिए 3800 आवेदनों की जाँच कर रहा है, जिसका लक्ष्य नए शैक्षणिक वर्ष से पहले रिक्तियों को भरना है। कॉलेज आरक्षण के लिए बिंदु रोस्टर का सत्यापन कर रहे हैं, जिससे भर्ती प्रक्रिया सुव्यवस्थित हो रही है।