पोलिस भरतीवर ४४ कॅमेऱ्यांची करडी नजर

By Admin | Updated: March 28, 2016 00:16 IST2016-03-28T00:00:13+5:302016-03-28T00:16:31+5:30

लातूर : राज्यभरात एकाच दिवशी सुरु होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, लातूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ३१ जागांसाठी

44 cadres of police recruitment | पोलिस भरतीवर ४४ कॅमेऱ्यांची करडी नजर

पोलिस भरतीवर ४४ कॅमेऱ्यांची करडी नजर


लातूर : राज्यभरात एकाच दिवशी सुरु होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, लातूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ३१ जागांसाठी तब्बल तीन हजार १४१ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. ही पोलिस भरती मंगळवारपासून दोन टप्प्यात होणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
राज्यभरातील सर्वच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी ४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील रिक्त ३१ जागांसाठी तीन हजार १४१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ही प्रक्रिया येत्या मंगळवारपासून बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होत आहे. जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदासाठी ही भरती होत असून, फेब्रवारी महिन्यापासूनच या भरतीची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पोलिस शिपाई भरती पारदर्शक व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने २९ कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. तर अन्य १५ कॅमेरे भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मैदानांवरील प्रत्येक हालचालींवर या कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
पोलिस शिपाई पदासाठी किमान २ हजार २५० उमेदवार हे उच्चशिक्षित असून, बी. ए. च्या पुढे शिक्षण असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एम. ए, डी. एड, बी. एड, बी. पी. एड, आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. नोकरी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या उच्चशिक्षितांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता थेट अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: 44 cadres of police recruitment