शहरात ३६.२ मि. मी. पाऊस

By Admin | Updated: July 9, 2014 00:50 IST2014-07-09T00:45:11+5:302014-07-09T00:50:01+5:30

औरंगाबाद : महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी परतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा शहरात हजेरी लावली.

36.2 mins in the city Me Rain | शहरात ३६.२ मि. मी. पाऊस

शहरात ३६.२ मि. मी. पाऊस

औरंगाबाद : महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी परतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा शहरात हजेरी लावली. निम्म्या शहरात दुपारनंतर चांगला पाऊस झाला. तर काही भाग कोरडाच राहिला. चिकलठाणा वेधशाळेत ३६.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरात कुठेही नुकसान झाले नाही. दरम्यान, रात्री आठ वाजेनंतर शहरातील सर्वच भागात रिमझिम पावसाला पुन्हा सुरुवात झाली.
शहरात रविवारी रात्री महिनाभराच्या विश्रांतीनंतर समाधानकारक पाऊस झाला. बऱ्याच दिवसांनंतर पाऊस झाल्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. त्यात आज दुपारी आकाशात सर्वत्र काळे ढग दाटून आले. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे दुपारी ३.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. चिकलठाणा, सिडको, रेल्वेस्टेशन, गारखेडा, सातारा परिसर, देवळाई, हडको, हर्सूल आदी भागांत रिमझिम पाऊस झाला. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी शहरात पाऊस झाला. मात्र, भावसिंगपुरा, टाऊन हॉल, समर्थनगर, औरंगपुरा, विद्यापीठ परिसर, मिलकॉर्नर, घाटी परिसर आदी भागात पावसाचा थेंबही पडला नाही. शहरातील अनेक भागांत सुमारे तासभर रिमझिम पाऊस बरसत होता. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. मात्र, या पावसामुळे कुठेही नुकसान झाले नाही. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २४ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराचे तापमान दुपारनंतर अचानक खाली आले. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.
आतापर्यंत ३९ मि. मी. पाऊस
जिल्ह्यात चालू वर्षी १ जून ते ७ जून या काळात केवळ ३९ मि. मी. पाऊस झाला आहे. सरासरीचा विचार करता आतापर्यंत १७४ मि. मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पावसाची सरासरी खाली आली आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ७८ मि. मी. कमी पाऊस झाला आहे.

Web Title: 36.2 mins in the city Me Rain