मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप, बीड आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:31 IST2025-08-20T18:31:07+5:302025-08-20T18:31:30+5:30

महसूल प्रशासनाने २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासत शोधल्या नोंदी

2 lakh 36 thousand Kunbi caste certificates distributed in Marathwada in 22 months, Beed in the lead | मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप, बीड आघाडीवर

मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप, बीड आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात २ लाख ३६ हजार ५७ कुणबी जात प्रमाणपत्र १ नोव्हेंबर २०२३ पासून आजवर देण्यात आली आहेत. आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ पुराव्यात शोधलेल्या सुमारे ४७ हजार ८४५ मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळीप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. अभिलेख तपासणीत खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कुळ नोंदवही, १९५१चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, ७/१२, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तऐवज, भूमी अभिलेखमधील ७ दस्तऐवज, मुंतखब आदी तपासले. जुन्या कुणबी नोंदीवरून कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत मराठा समाज आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने विभागात सर्व नोंदी तपासण्याचे आदेश दिले होते.

२१ रोजी समिती, जरांगे यांच्यात बैठक
कुणबी प्रमाणपत्र संशोधन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या तीन सदस्यांनी सोमवारी बीड येथे आढावा घेतला. मंगळवारी वैजापूर तालुक्यातील अभिलेखांची माहिती घेतली. २१ ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालय येथे शिंदे समिती आणि जरांगे यांच्यात बैठक होईल. जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे समिती सदस्य जुने रेकॉर्ड तपासत आहे.

जिल्हा......................दिलेले प्रमाणपत्र
छत्रपती संभाजीनगर.....१९५८१
जालना.....................१४३३६
परभणी.......................१२६७१
हिंगोली....................८५२६
लातूर......................२१९२
नांदेड......................४२७६
बीड........................१६०५७१
धाराशिव..................१३०९४
एकूण....................२३६०५७

बीडमध्ये १ लाख ६० हजार प्रमाणपत्रांचे वाटप
२ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ कागदपत्रांच्या तपासणीत ४७ हजार ५४६ कुणबी नोंदी आढळल्या. त्याची माहिती प्रशासनाने शिंदे समितीला सादर केली आहे. विभागात सर्वाधिक १ लाख ६० हजार ५७१ प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यात वाटप करण्यात आली.

Web Title: 2 lakh 36 thousand Kunbi caste certificates distributed in Marathwada in 22 months, Beed in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.