शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१८ कोटींच्या गौण खनिजाची चोरी

By admin | Updated: July 18, 2014 01:48 IST

चेतन धनुरे , लातूर महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन खाणमाफियांनी मांडलेला उच्छाद दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही़

चेतन धनुरे , लातूरमहसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन खाणमाफियांनी मांडलेला उच्छाद दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही़ कारण, या माफियांनी कोणताही परवाना न घेता थोडथोडके नव्हे तर सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल १८ कोटी ४० लाख रुपये किंमतीच्या गौण खनिजाची चोरी केल्याचे उघड झाले आहे़ जिल्ह्यातील १६ अवैध खाणपट्ट्यांतून ही चोरी झाली असून, संबंधित तहसीलदारांनी मात्र कारवाईत अजूनही हात आखडताच घेतला आहे़जागा स्वत:च्या मालकीची असली तरी त्यातून गौण खनिजाचा उपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे़ मर्यादित क्षेत्रात खोदकाम करण्यासाठी मर्यादित कालावधीचा परवाना हा विभाग देत असतो़ त्यासाठी परवानाधारक खाण पट्टाधारकाकडून गौण खनिज उपश्याच्या प्रमाणात रॉयल्टी भरुन घेण्यात येते़ परंतु, जिल्ह्यातील १६ ठिकाणी खनिकर्म विभागाचा कसलाही परवाना न घेता गौण खनिजाचा बेफाम उपसा केला आहे़ महसूल विभागानेच शोधून काढलेल्या या विनापरवाना खाण पट्ट्यातून तब्बल १ लाख ८३ हजार ९८८ ब्रास गौण खनिजाचा उपसा केला असल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले़ या गौण खनिजात प्रामुख्याने दगडाचा समावेश आहे़ सध्याच्या बाजारभावानुसार चोरी झालेल्या या गौण खनिजाची किंमत १८ कोटी ३९ लाख ८८ हजार रुपये इतकी भरते़उदगीर ही अवैध खाणपट्ट्यांची राजधानीच ठरली आहे़ या तालुक्यात परवानाधारक खाण पट्ट्यांपेक्षा अवैध खाण पट्ट्यांचीच संख्या अधिक आहे़ याठिकाणी केवळ ६ खाण पट्ट्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे़ मात्र कसलाही परवाना न घेता तब्बल ११ खाणपट्टे तयार झाले़ त्यातून तब्बल १ लाख ३६ हजार ८९८ ब्रास गौण खनिजाची चोरी करण्यात आली आहे़ ज्याची किंमत १३ कोटी ६८ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे़ लातूर तालुक्यातही २ अवैध खाणपट्टे असून तेथून २५ हजार ९९५ ब्रास तर अहमदपूर तालुक्यातील २ अवैध खाणपट्ट्यांतून २१०९५ ब्रास गौण खनिजाची चोरी झाली़ चाकूर तालुक्यातही १ अवैध खाणपट्टा आहे़ मात्र त्यात पाणी असल्याने किती गौण खनिजाचा उपसा झाला, याची मोजणी करता आली नाही़मोजणीतून प्रकार उघड...खाण पट्ट्यातून किती ब्रास गौण खनिजाचा उपसा झाला, याची अचूक मोजणी करणारे ‘इटीएस’ तंत्र विकसीत करण्यात आले आहे़ या तंत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी मराठवाड्यात पहिल्यांदाच लातूरमध्ये मोजणी करुन घेतली़ त्यातून हे गौडबंगाल समोर आले़ आणखीही काही खाणपट्ट्यांची सध्या मोजणी सुरू आहे.कारवाईस उशीऱ़़गौण खनिज चोरीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले़ परंतु, अद्याप एकही कारवाई झाली नाही़ कलम ४८ (७) मधील तरतुदीनुसार गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करीत सध्याच्या बाजारभावानुसार चोरी केलेल्या गौण खनिजाची किंमत काढून त्याच्या तिप्पट दंड आकारण्याचे अधिकारही तहसीलदारांना आहेत़तहसीलदारांना कारवाईसंदर्भात सूचित करण्यात आले आहे़ अवैध खाणपट्ट्याच्या जागामालकाने हे गौण खनिज उपसले की अन्य कोणाने, याबाबतची पडताळणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे़ एकदा आरोपी निश्चित झाल्यास त्यांच्यावर दंड आकारणीसह गुन्हेही दाखल करण्यात येतील़ - विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी