शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामासाठी १७५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:48 IST

तालुक्यातील प्रमुख राज्य रस्ता असलेल्या जिंतूर- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याचा एम.आर.आय.पी. या योजनेत समावेश केला असून जिल्ह्यातील येलदरी-सेनगाव- सवना- मोप ते जिल्हा सिमा या दरम्यान पेव्हड शोर्ल्डरसह दुपरीकरण करण्यासाठी प्रशासकीय, तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाकरीता १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची लवकरच निविदा निघणार आहे.

राजकुमार देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील प्रमुख राज्य रस्ता असलेल्या जिंतूर- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याचा एम.आर.आय.पी. या योजनेत समावेश केला असून जिल्ह्यातील येलदरी-सेनगाव- सवना- मोप ते जिल्हा सिमा या दरम्यान पेव्हड शोर्ल्डरसह दुपरीकरण करण्यासाठी प्रशासकीय, तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाकरीता १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची लवकरच निविदा निघणार आहे.जिल्ह्यातील येलदरी- सेनगाव- कनेरगाव नाका या राज्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाईट अवस्था झाली आहे. सेनगाव तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या या रस्त्याचे अनेक वर्षापासून रुंदीकरणाचे काम रखडत पडले आहे. सेनगाव- गोरेगाव-सवना या दरम्यान रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्याशिवाय हत्ता पाटी ते येलदरी दरम्यानही रस्ता भुईसपाट झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक पर्यायी रस्ता शोधत आहेत. मराठवाडा- विदर्भाला जोडणाºया या रस्त्याची निधी अभावी कायम अहवेलना झाली आहे. सर्व राज्यरस्त्याचे रुंदीकरण झाले. परंतु हा रस्ता केवळ साडेतीन मीटरचाच व मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेलाच राहिला. परंतु विलंबाने का होईना; या रस्त्याचा कायापालट होणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने पहिल्यांदाच मोठा निधी तालुक्याकरिता मंजूर झाला आहे. गतवर्षी २९ नोव्हेंबरला हॅब्रिट अ‍ॅनोटी या योजनेत सदर रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. या कामाकरिता १७५ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा अंदाजित खर्चाचा निधी मंजूर करण्यात आला होता. जिल्हाअंतर्गत येणाºया या रस्त्याचे सात मीटरचे डांबरीकरण व दुपरीकरण होणार आहे. पेव्हड शोर्ल्डरसह १० मीटरचा हा रस्ता होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण, लहान पूल, मोºयांची पुनर्बांधणी, रुंदीकरण, काँक्रीट रस्ता, पेव्हड शोर्ल्डस, कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी, सेवा वाहिन्या नलिका, वृक्ष लागवड इ. कामे होणार आहेत. या रस्त्यावरील सध्याचे अरुंद पूल मोठे होणार आहेत. संपूर्ण रस्ता हा अत्यंत आधुनिक पद्धतीने सपाटीकरण करून विकसित होणार आहे. या कामास यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली असून नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली. त्यामुळे सदर कामाची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. तालुक्यातील पहिल्यांदाच रस्त्याच्या विकासाकरिता रेकॉर्डब्रेक निधी मिळाला मिळाल्याने सुसज्ज असा लक्षवेधक रस्ता या निधीतून तयार होणार आहे.