शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुरू होऊन १२४ शाळा पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

--- औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन आठवडे सरले. पहिल्या दिवशीपासून ...

---

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन आठवडे सरले. पहिल्या दिवशीपासून शाळांना गावकरी, पालकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने २९ टक्क्यांवरची उपस्थिती वाढून ५९ टक्क्यांवर पोहोचली. मात्र, त्यानंतर पुन्हा गावात कोरोना रुग्ण आढळल्याने १२४ शाळा बंद कराव्या लागल्या, तर सध्या ५७८ शाळा उघड्या असून, दररोज वर्ग भरत आहेत.

जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांनी शाळांची उपस्थिती, वाऱ्या वादळाने झालेले नुकसान, बालविवाह, शिक्षक समायोजनासंबंधीचा आढावा शुक्रवारी घेतला. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीला मुदतवाढ द्या, अन्यथा नव्याने शाळा समित्यांची निवड करा, अशी शिफारस शासनाला केली आहे, तर नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात जिथे कोरोनाचा उद्रेक नाही त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसण्यासह ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे व तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षण समितीने राज्य शासनाकडे केल्याचे गलांडे यांनी सांगितले. बैठकीला शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण, सदस्य पुष्पा काळे, शिल्पा कापसे, रेणुका जाधव, बबन कंदारे, बळिराम भुमरे, प्रभाकर पवार यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

उपस्थिती ३० टक्क्यांनी वाढली

जिल्ह्यातील १३५१ शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यापैकी महिनाभरापासून कोरोनामुक्त गावांत ५७८ शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने सध्या अकरावीचा वर्ग बहुतांश ठिकाणी भरत नाही. १५ जुलैला २९ टक्के उपस्थिती होती, तर १९ जुलैच्या उपस्थितीनुसार सुरू असलेल्या ४३२ शाळांत ३९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. आठवडाभरात विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्क्यांनी वाढून ५९ टक्के झाली.

---

तालुका : एकूण शाळा -सुरू शाळा - सुरू होऊन बंद

औरंगाबाद -५८९ -९२ -१६ -

कन्नड -९९ -७१ -१८

खुलताबाद -५५ -४१ -७

गंगापूर -११९ -५७ -१७

पैठण -११२ -६१ -१८

फुलंब्री -९७ - ५८ -८

वैजापूर -१२८ - ५१ - १९

सिल्लोड -१२२ - १२० -१४

सोयगांव - ३० - २६ - ७