शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दच्या कालव्यात पडून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: July 27, 2014 00:01 IST

काल शुक्रवारी सायंकाळी आपली कामे आटोपून आपल्या राहत्या गावी जुगनाळा येथे जात असताना गोसीखुर्द कालव्याच्या पुलावरुन तोल जाऊन दुचाकीसह एक युवक खाली कोसळला.

पूल सदोष : उपाय करण्याची मागणीब्रह्मपुरी : काल शुक्रवारी सायंकाळी आपली कामे आटोपून आपल्या राहत्या गावी जुगनाळा येथे जात असताना गोसीखुर्द कालव्याच्या पुलावरुन तोल जाऊन दुचाकीसह एक युवक खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्र धोटे रा. जुगनाळा (३३) असे सदर युवकाचे नाव आहे. शेतकऱ्याच्या वरदानासाठी उभारलेला गोसीखुर्द कालवा अनेक लोकांचे बळी घेत असल्याने शाप ठरलेला आहे. हे पुन्हा या घटनेने सिद्ध केले आहे. नरेंद्र धोटे हा युवक बेटाळा येथे ट्रॅक्टर चालक होता. संपूर्ण दिवसभर आपले कार्य आटोपून आपल्या मालकाच्या दुचाकीने सायंकाळी ७ वाजता तो जुगनाळाकडे निघाला. परंतु रस्त्यावर बांधलेला पूल हा रस्त्याला अनुसरुन नसल्याने व त्यावर कोणत्याही प्रकारचे कठडे उभारले नसल्याने तोल जाऊन नरेंद्र दुचाकीसह २० फुट खोलीच्या कालव्यात कोसळला.चौगाण- जुगनाळा रस्त्यावर कृषक विद्यालयाजवळ गोसीखुर्द विभागाने उजवा कालव्यावर पूल तयार केला. परंतु विभागाने जखम एकीकडे व मलम दुसरीकडे लावण्यासारखा प्रकार केला आहे. रस्त्याला अनुसरुन पुलाचे बांधकाम झाले नाही. रस्ता एकीकडे तर पूल दुसरीकडे, असे स्वरुप पहायला मिळते. या पुलाबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. गोसीखुर्दच्या मुख्य अधिकाऱ्यांना मौका स्थळी आणून ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु कुठलीही कार्यवाही नाही.(प्रतिनिधी)