बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:41+5:30

भोला पचारे हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात काम करीत होता. अचानक कारखान्यातील एका बेल्टमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कामगारांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जोपर्यत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एका नोकरी देणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी कठोर भूमिका कुटुंबीयांनी व इतर कामगारांनी घेतली.

Worker death on the spot by pressing into a belt | बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू

बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्देपरिसरात तणाव : लायड मेटल कारखान्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील लायड मेटल कारखान्यात काम करीत असताना बेल्टमध्ये दबून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव भोला नारायण पचारे असे आहे. अपघाताची बातमी करखान्याच्या बाहेर येताच कामगार व नागरिकांनी मुख्य गेटवर एकत्रित येऊन व्यवस्थापनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व एकाला नोकरी अशी मागणी लावून धरण्यात आली. वाटाघाटीनंतर ५५ लाखांची मदत व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्यानंतर तणाव निवळला.
भोला पचारे हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात काम करीत होता. अचानक कारखान्यातील एका बेल्टमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कामगारांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जोपर्यत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एका नोकरी देणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी कठोर भूमिका कुटुंबीयांनी व इतर कामगारांनी घेतली. दरम्यान, लायड मेटल व्यवस्थापनाचे अधिकारी मेहता, ठाणेदार आमले व सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात कंपनीने मागण्या मंजूर केल्या.

यापूर्वीही सुरक्षा रक्षकाचा गेला होता बळी
यापूर्वी १५ जानेवारीच्या रात्री सुरक्षा रक्षकाला घेऊन रात्रकालीन गस्त करताना एका शेतातील वीज प्रवाहित तारेला स्पर्श होऊन सुरक्षा रक्षकाच्या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्या मृतकाच्या परिवाराला व्यवस्थापनाकडून ४० लाख व नोकरी देण्यात आली होती.

Web Title: Worker death on the spot by pressing into a belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात