शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

एलटीसीच्या नावावर शिक्षकांकडून १७ लाखांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना चार वषातून एकदा कुटुंबासह महाराष्ट्र दर्शन घेण्याची योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील २३३  शिक्षकांनी लाभ घेतला. गणपती पुळे येथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून त्यांनी दान दिल्याची पावती जोडल्याचे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने केलेल्या अंकेक्षणातून उघडकीस आले. गणपती पुळे येथे दान दिल्यानंतर संगणीकृत पावती दिली जाते.

ठळक मुद्देलेखा परिक्षणातून चलाखी उघडकीस : २३३ जिल्हा परिषद शिक्षक अडचणीत

  लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा  : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या २३३ शिक्षकांनी रजा प्रवास सवलतीच्या नावावर १७ लाख ८४ हजार ७२१ रूपयांची  उचल केल्याचा ठपका सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केलेल्या अंकेक्षणातून उघडकीस आले आहे. त्यामुळेजिल्हा परिषद  शिक्षण विभागात  खळबळ उडाली आहे.   जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना चार वषातून एकदा कुटुंबासह महाराष्ट्र दर्शन घेण्याची योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील २३३  शिक्षकांनी लाभ घेतला. गणपती पुळे येथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून त्यांनी दान दिल्याची पावती जोडल्याचे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने केलेल्या अंकेक्षणातून उघडकीस आले. गणपती पुळे येथे दान दिल्यानंतर संगणीकृत पावती दिली जाते. मात्र ट्रॅव्हल एजन्सीतर्फे सर्व मॅनेज करून स्वतः पावत्या छापून रत्नागिरी येथील गणपती पुळे येथे गेल्याचा व दान केल्याचा पुरावा म्हणून सादर केल्याची माहिती २०१९ - २०२० मध्ये उघड झाली आहे.  अंकेक्षणातून गुरूजींची ही चलाखी लक्षात आल्याने जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी चौकशी करण्याचे आदेश वित्त आणि लेखा विभागाला दिले आहेत. दरम्यान,  पंचायत समितीला अजुन अहवाल मिळाला नाही, अशी माहिती संवर्ग विकास अधिकारीओमप्रकाश रामावत यांनी दिली.

सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केलेल्या अंकेक्षणातून राजुरा पंचायत समिती अंतर्गत २३३ शिक्षकांनी एलटीसीच्या नावावर रक्कमेची उचल केली.  या सर्व शिक्षकांना नोटीसा बजावून ही रक्कम तातडीने वसूल केली जाईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई करू.  - राहुल कडिले,   मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर 

सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण राज्य यांच्याकडे जि. प. चेही  अंकेक्षन केले जाते. अंकेक्षणानुसार रजा प्रवास सवलतीच्या नावावर  शिक्षकांनी रकमेची उचल केली. अहवाल मिळाल्यानंतर तातडीने कारवाई सुरू होईल. - अशोक मातकर, लेखा व वित्त अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक