शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सतत भांडणाऱ्या नवऱ्याची बायकोने केली हत्या; बनाव आत्महत्येचा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:57 IST

भद्रावती शहरातील किल्ला वार्ड येथे राहणाऱ्या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही बनाव असून प्रत्यक्षात त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : भद्रावती शहरातील किल्ला वार्ड येथे राहणाऱ्या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही बनाव असून प्रत्यक्षात त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.प्रणाली गणेश वाटेकर (२५) रा. किल्ला वॉर्ड असे आरोपीचे नाव असून तिने आपला पती गणेश उर्फ अतुल वाटेकर याचा खून केल्याची कबुली दिली आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. त्यांना १५ महिन्यांची मुलगी आहे. विवाहानंतर पती कमी व पत्नी जास्त शिकलेली यावरून तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यात भांडणे होत असत. या काळात आरोपी आपल्या माहेरीही बरेचदा निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी गणेश हा त्याच भागात वेगळा राहू लागला होता. २१ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास प्रणालीने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केलची माहिती दिली. मात्र गणेशचा धाकटा भाऊ हेमंत याने आपल्या भावासोबत काही घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व प्राथमिक अहवाल याआधारे चौकशी सुरु केली. प्रणालीने काही वेळेस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली व तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे दोन्ही हात बांधून त्याच्या गळ्यावर दुपट्टा आवळून व त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून त्याला ठार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी