शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दंडार नाट्य लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 14, 2015 01:14 IST

दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे.

लोककला जपण्याची गरज : तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक ठेवा नष्टनवरगाव : दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे. दंडार ही लोककलेचा भाग असून १५ वर्षापूूर्वी ग्रामीण भागात दंडारीचे सादरीकरण सणासुदीच्या वेळेत गावागावात होत असे. मात्र आज ही लोककला एखाद्यावेळेस पाहावयास मिळते. हळूहळू ती लोप पावत आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने रत्नापूर हेटी (इंदिरानगर) येथील श्री बाल दंडार मंडळाने ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या दंडारीचे सादरीकरण करुन लुप्त होत चाललेल्या दंडारीची रसिकांना दिवाळी भेट दिली.दंडारीत स्त्री पात्राचे काम पुरुषाला करावे लागते. दंडार ढोकली, तुनतुने, टाळ यासारख्या वाद्यांच्या निनादात सादर केली जाते. पात्रांच्या बोलण्याच्या वाक्यापेक्षा गाण्यांचीच भर मोठ्या प्रमाणात असते. एक- दोन महिने तालीम करुन दंडारीचे सादरीकरण केले जाते. पंधरा- वीस वर्षांपूर्वी दंडार मंडळे अस्तित्वात होती. सणासुदीला दंडारीचे प्रयोग विरंगुळा म्हणून सादर केले जायचे. मात्र काळानुरुप मनोरंजनाच्या कार्यक्रमात तंत्रज्ञानाची वेगळीच भर पडल्यामुळे दंडारीचे प्रयोग कमी झाले. आजच्या युगात टीव्ही, चित्रपट यासारख्या विविध माध्यमांची भर पडत गेल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यामुळे दंडार काळानुरुप काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.दंडार म्हटले की, रात्री ८ ते ९ वाजता सुरु झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालत असे. या दंडारीला मुख्यत्वे करुन महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित होता. दंडारीच्या माध्यमातून रामायण, महाभारत, राजा- राणीच्या विषयावरील ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केल्या जायचे. यासोबतच संगीत नाटकाचे सादरीकरणही ग्रामीण भागात होत होते.आज संगीत नाटकही काळानुरुप लोप पावत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दंडारीला मनोरंजनाचे साधन समजले जात असले तरी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. परंतु ही लोककला आज लोप पावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या दिवशी रत्नापूर हेटी (इंदिरानगर) यथील श्री बाल दंडार मंडळातील युवकांनी ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या सामाजिक विषयावरील दंडारीचे सादरीकरण करुन संस्कृतीचा ठेवा जपल्याचे दिसून आले. (वार्ताहर)