शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली.

ठळक मुद्देआठ एकरात नऊ लाखांचे उत्पादन, बेरोजगारीवर मात करून फुलविली टरबूज शेती

अमोद गौरकर।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : वडिलांनी शेती पिकवून मुलाला उच्चशिक्षित केले. नोकरी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण झाले नाही. अखेर मुलांनीच वडीलाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी नदीच्या पात्रात पिकणारी टरबूज शेती थेट शेतीच्या बांधावर पिकवून उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने टरबूज शेती करण्याचा सल्ला दिला. नदीपात्रात पिकणारे टरबूज शेतीच्या बंधावर कसे पिकवायचे याची माहिती दिली. त्यामुळे रब्बी हंगामात टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या आठ एकर शेतात लागवड केली.हर्षल माने यांच्यासोबतच शंकरपूचे मंडळ अधिकारी आर. के. निखारे, कृषी सहाय्यक पी. टी. भगत, पी. वाय. नंद, वाय. डब्लू रघुते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यात आठ एकरमध्ये नऊ लाखांचे पीक घेतले. यांच्या सोबतच बाळू पांगुळ यांनीही टरबूज लागवड करून भरघास पीक घेतले. नदी पात्रात टरबूज शेती केल्याने पाणी कमी लागते. मात्र, शेतीत याचा खर्च वाढण्याचा धोका असतो. अशावेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टरबूजसाठी पोषक ठरले. मनात इच्छा असली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळत असते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने व नवनवीन पिके घेऊन शेती करावी, असे आवाहन रोशन पांगुळ यांनी केले.लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटलेनदीपात्राऐवजी शेतात टरबूज लागवड केल्याने यासाठी चार लाखांचा खर्च आला. खर्च वजा करून पाच लाखांचा नफा झाला. हा नफा पुन्हा वाढला असता. परंतु, लॉकडाऊनमुळे मोठी बाजारपेठ मिळाली नाही, अशी माहिती रोशन पांगुळ यांनी दिली.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती टाळावीचिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. अनेक शेतकºयांचा शेती करण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असल्याने दरवर्षी मोठे नुकसान होते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी नवीन नगदी पिके घ्यावी, असा सल्ला रोशन पांगुळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती