शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

By admin | Updated: October 1, 2014 23:20 IST

मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात वारंवार बदल घडवून आणले आहेत. १५ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील

मतदारांत उत्सुकता : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रथमच वापरचंद्रपूर : मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात वारंवार बदल घडवून आणले आहेत. १५ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदार संघात व्हीव्हीपॅटचा उपयोग करुन निवडणूक आयोगाने पारदर्शकतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. हा प्रयोग चंद्रपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच होत असून व्हीव्हीपॅट विषयी मतदारांत कमालीची उत्सुकता आहे.बॅलेट बॉक्स, ईव्हीएम मशीन ते व्हीव्हीपॅट असा मतदान प्रक्रियेचा प्रवास असून महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व अहमदनगर शहर या मतदार संघात व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला पडले की नाही, हे या यंत्रात मतदारांना पाहता येणार आहे.वोटर व्हेरीफियबल पेपर आॅडीट ट्रायल सिस्टम अर्थात व्हीव्हीपॅट महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग प्रथमच वापरणार आहे. ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडलेले असणार आहे. मतदारांनी मतदान केल्यानंतर सात सेकंदापर्यंत या मशिनवर ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याचे चिन्ह, अनुक्रमांक व नाव मतदाराला पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. ईव्हीएमवरील एका उमेदवाराच्या चिन्हावरील बटन दाबल्यावर दुसऱ्याच उमेदवाराला मतदान पडते, अशा घटना व तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यामुळे व्हीव्हीपॅटची निर्मिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशिनवरच होणार असून व्हीव्हीपॅट फक्त मतदान ज्यांना केले ते बरोबर आहे की नाही, हे पाहण्याची सुविधा आहे. मतदान ज्या व्यक्तीला केले, त्याला न पडता दुसऱ्याच व्यक्तीला पडले, असे मतदाराच्या निदर्शनास आल्यास मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे तात्काळ तक्रार नोंदविता येईल. त्यानंतर मतदान केंद्र अधिकारी तक्रारीची दखल घेवून मतदारासमोर त्याच चिन्हावर डमी वोट करण्याची लेखी प्रक्रिया करेल. मतदाराच्या तक्रारीत सत्य आढळून आल्यास त्या मशिनवरील मतदान प्रक्रिया स्थगित केली जाईल. तक्रार खोटी असल्यास संबंधितावर निवडणुक कार्यपद्धतीच्या कामात अडथळा आणला म्हणून मतदान केंद्रा अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. (प्रतिनिधी)