शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र लावून देण्यास विद्युत मंडळाची "ना"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शेतातील कृषीपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : शेतातील कृषीपंपांसाठी लावण्यात आलेले रोहित्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ते काढून नेण्यात आले असले तरी ते लावून देण्यात विद्युत मंडळाची चालढकल सुरू आहे. या प्रकाराने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज जोडण्या देण्यात आल्या; मात्र लावण्यात आलेले काही रोहित्र निकृष्ट निघाले. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचे वर्षभरातच रोहित्र बंद पडले. रोहित्र बंद पडल्यामुळे वीज पुरवठाही बंद झाला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणीचे रोहित्र बंद पडले, त्या शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे तक्रार केल्यानंतर दुरुस्तीसाठी म्हणून ते वीज मंडळाकडून रोहित्र काढून घेण्यात आले; मात्र या बाबीस आता सहा-सात महिन्यांचा कालावधी होत असला तरी ते अद्यापही लावून देण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, अशा बंद असलेल्या व वीज वितरण कंपनीने दुरुस्तीसाठी काढून घेतलेल्या रोहित्रांची संख्या २० च्या घरात आहे.

बॉक्स

आता स्वतंत्र रोहित्र

नागभीड तालुक्यात २००० ते मार्च २०१८ पर्यंत २ हजार २०३ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली. काही वर्षांपूर्वी रोहित्र सामूहिक म्हणजे कमीत कमी १० शेतकऱ्यांना देण्यात येत होते; पण आता स्वतंत्र रोहित्र देण्यात येत आहे. नागभीड तालुक्यात मुख्य पीक धानाचे आहे. सद्यस्थितीत पाऊस योग्य पडत असला तरी तो, केव्हा आपला इंगा दाखवेल, याचा भरवसा नाही. वीज वितरण कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे रोहित्र दुरुस्तीसाठी काढले त्यांचे रोहित्र त्वरित लावून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कोट

काही रोहित्र दुरुस्तीसाठी काढून आणण्यात आले आहेत; मात्र नियमानुसार थकीत असलेले बिल अदा केल्याशिवाय रोहित्र लावून देता येणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्या शेतकऱ्यांचे रोहित्र लावून देण्यात आले आहेत.

- आर. यु. कारगावकर

उपविभागीय अभियंता, नागभीड.