शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

By admin | Updated: June 9, 2014 23:32 IST

पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा

शेतकर्‍यांचेही नुकसान : पर्यावरण संरक्षणाचे धिंडवडेसास्ती : पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अर्मयाद उपसा, वाहनांचे वाढते प्रमाण तसेच वाढते औद्योगिकरण हे सर्व पर्यावरण संतुलित राखण्यात बाधक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात मानवाला सुखी व समृद्ध जीवन जगणे कठीण होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. अशातच राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या विविध कोळसा खाणींमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे परिसरात पर्यावणाचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसत आहे. मात्र वेकोली प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी तसेच नव्याने झालेल्या गोयेगाव अशा विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाण परिसरात कमालीचे प्रदूषण वाढलेले आहे. मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोंढे पसरले जात आहे. कोळसा उत्पादनासाठी खोलवर खोदकाम करुन मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. कोळसा खाणीत होणार्‍या ब्लॉस्टींगमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषणही होत आहे. तर उत्पादन केलेला कोळसा वाहून नेण्याकरिता होणारी वाहतुकही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे. प्रदूषणामुळे परिसरातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंतच्या सर्वच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दमा, फुफ्फुसाचे आजार बळावले आहे. प्रदूषणामुळे परिसरातील शेती उत्पादनातही घट झाली आहे. प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने वेकोलि प्रशासन मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही निद्रावस्थेत आहे. त्यांचेही वेकोलिच्या किंवा जिल्ह्यातील विविध कारखाण्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे दुर्लक्ष आहे. वेकोलि विविध फलके लावून व फक्त कार्यक्रम घेऊन पर्यावणाचे संरक्षणाचा कांगावा करीत आहे. वेकोलिने खाण परिसरात वृक्षांची लागवड केली. परंतु त्यांचे संरक्षण करण्यात ते असर्मथ ठरले आहे. वेकोलिच्या या प्रदूषणामुळे कोळसा खाण परिसरातीलच नागरिक नव्हे तर कोळसा खाणीत काम करणारे कामगार व त्या परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे वेकोलि प्रशासन नागरिकांच्या नव्हे तर आपल्या कामगारांच्याही जिवावर उठला आहे.  (वार्ताहर)