शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचेच ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST

पूर्वी ज्येष्ठांना व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास ...

पूर्वी ज्येष्ठांना व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ९८ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. पूर्वी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर आरोग्य विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर लसीकरणाच्या संख्येत भर पडली. त्यामुळे सर्व विभागाचे साधारणत: आठ हजाराच्या जवळपास लसीकरण होत होते. मात्र मागील आठवड्यापासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. बहुतांश केंद्र बंद आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३ केंद्र सुरू होते. त्यातही केवळ बोटावर मोजण्याइतक्या लस उपलब्ध होत्या. परिणामी लसीकरणाची संख्या घटत आहे. ८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ३० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर बहुतांश जणांचे लसीकरण बाकी आहे.

बॉक्स

गेल्यापावली परत

४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू झाल्याबरोबर लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा झाला नाही. परिणामी लसींचा तुटवडा जणावत आहे. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर लस नसल्याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश जण लस घेण्यासाठी केंद्रावर जात असून त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

कोट

एकीकडे शासन ४५ वर्षांवरील नागरिकांना लस बंधनकारक केली आहे आणि दुसरीकडे लस नसल्याची बतावणी करून आल्या पावली परत जावे लागत आहे. मागील तीन दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रावर जाऊन परत येत आहे.

- लसीकरण पात्र लाभार्थी

-------

लसीबाबत असलेला पूर्वग्रह दूर झाला. लस घेऊन प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. परंतु, लस नसल्याने लसीकरणाची प्रतीक्षा लागून आहे.

- लसीकरण पात्र लाभार्थी

-----------

जिल्ह्यात लसीकरणाचे ९८ केंद्र स्थापित केले आहे. मार्च महिन्यात दररोज आठ हजारच्या जवळपास लसीकरण करण्यात येत होते. परंतु, आता लसीचा तुटवडा असल्याने केवळ तीनच केंद्र सुरू आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे.

डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर