शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे दोन ठकबाज पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 7, 2015 00:57 IST

उच्च शिक्षणासाठी व व्यवसायासाठी आॅनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातीला बळी पडून येथील एका महिलेने ‘त्या’ ठकबाजांशी संपर्क साधला.

भद्रावती : उच्च शिक्षणासाठी व व्यवसायासाठी आॅनलाईन कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातीला बळी पडून येथील एका महिलेने ‘त्या’ ठकबाजांशी संपर्क साधला. त्या महिलेला ९९ हजार रूपयांनी गंडविल्याची घटना २४ एप्रिलला घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुजरातच्या दोन ठकबाजांना बुधवारी अटक केली. हिरेनकुमार हरेशभाई राजगोट (२४) रा. गामबेदडा ता. मांडवी जि. कच्छ (गुजरात) व हितेत वसंतलाल राजगोट (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीमध्ये आॅनलाईन लोन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कळवून त्यावर आपला मोबाईल नंबर या ठकबाजांनी टाकला होता. लोनसाठी आयुध निर्माणी येथील सुमती रमेश शेट्टी (४५) या महिलेने त्यांच्याशी संपर्क केला. २० लाख रूपयांचे लोन देण्यात येईल असे महिलेला सांगण्यात आले. महिलेने आपला बँक खाते नंबर, इमेल आयडी, पत्ता इत्यादी माहिती आॅनलाईन दिली. त्यावेळी आपणास लोन मंजूर झाल्याचे सांगून अर्ज फी, इन्शुरन्स, चेक क्लीयरन्स, डीडी काढण्याकरिता व साक्षीदार मिळविण्याकरिता असे एकूण ९९ हजार रूपये या ठकबाजांनी वेगळ्या खात्यात जमा करण्याकरिता महिलेला सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने रक्कम जमा केली. त्यानंतर लोनची २० लाख रूपयाची रक्कम आपल्या बचत खात्यात जमा व्हावी, यासाठी महिलेने ठकबाजांना फोनद्वारे कळविले. परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. या सर्व प्रकारावरुन आपली फसगत झाल्याचे महिलेला समजल्याने महिलेने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.ठाणेदार अशोक साखरकर यांनी खाते नंबर कुठले आहे, याचा शोध लावला. तेव्हा गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील मांडवी येथील खाते असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे एक विशेष पथक तयार करुन गुजरातला पाठविण्यात आले. माडवी येथील बँक गाठून खाते नंबर कोणाचे आहे, याबाबत माहिती काढली असता हिरेनकुमार राजगोळ याचे खाते निघाले. त्यांचा मोबाईल नंबर घेवून टावर लोकेशनच्या माध्यमातून आरोपी हिरेनकुमार राजगोट याला अटक केली. त्याने आपला बहिन जावई हितेत वसंतलाल राजगोट याच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही आरोपीला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (शहर प्रतिनिधी)