शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत अडीचशे जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

दिवाळीपासून लग्नकार्याला सुरुवात होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लग्नकार्यासाठी सभागृहाच्या तारखा मिळविण्यासाठी मोठी शर्यंत असायची. मात्र मागील वर्षींपासून कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे लग्नकार्यावर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे मंगल कार्यालयासह लॉनला उतरती कळा आली. कोरोनामुळे अनेकांनी सुरुवातीला लग्न सोहळे पुढे ढकलले. परंतु, कोरोनाचा संसर्ग काही कमी होऊन त्यामुळे काहींनी नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे उरकले.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील स्थिती : अनेकांनी लग्नसोहळे ढकलले पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बॅन्ड बाज्याच्या तालात वाजत गाजत मोठ्या थाटात लग्नकार्य करायचे स्वप्न अनेक विवाहयोग्य युवक युवतींनी बघितले होते. त्याप्रमाणे तयारीही केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर निर्बंध लादले. मात्र तरीही कोरोनाला वाकुल्या दाखवत सुमारे अडीचशे जोडप्यांनी मोजक्याच आप्तेष्ठांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पडल्याची माहिती आहे. दिवाळीपासून लग्नकार्याला सुरुवात होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लग्नकार्यासाठी सभागृहाच्या तारखा मिळविण्यासाठी मोठी शर्यंत असायची. मात्र मागील वर्षींपासून कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे लग्नकार्यावर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे मंगल कार्यालयासह लॉनला उतरती कळा आली. कोरोनामुळे अनेकांनी सुरुवातीला लग्न सोहळे पुढे ढकलले. परंतु, कोरोनाचा संसर्ग काही कमी होऊन त्यामुळे काहींनी नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे उरकले. तर काही मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला. मागील वर्षी सुमारे २५० जोडप्यांनी विवाह केले असल्याची माहिती आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना नियोजित तारखेला करण्यात येणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले होते. अनेकांनी मंगल कार्यालयांकडे पैसेही जमा केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सोहळे रद्द झाल्याने अनेक मंगल कार्यालय चालकांना पैसे परत करावे लागले. सध्यास्थितीत केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकायचा असल्याने कोणत्या नातेवाहिकाला बोलवायचे आणि कुणाला नाही, असा प्रश्न पडत असल्याने बहुतेकजण लग्न समोर ढकलत आहेत.

वर्षभरात ५५ लग्नतिथीगतवर्षात तब्बल ५५ लग्नतिथी होत्या. मात्र कोरोनामुळे अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलेले. थाटामाटात लग्न सोहळा पार पाडावा, अशा अपेक्षेत असलेल्याच्या आनंदावर यंदाही विरजन पडले. त्यामुळे विवाहेच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

रजिस्टर्ड मॅरेजचा पर्यायदरवर्षी रजिस्टर्ड मॅरेजला पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. विवाहयोग्य मुलांना धुमधडाक्यात लग्न करणे आवडत होते. मात्र मागील वर्षीपासून कोरोनामुळे अनेकांनी रजिस्टर्ड मॅरेजचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे विनावश्यक खर्चाला कात्री बसत आहे. 

मे कठीणचएप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. पण, मंगल कार्यालयात केवळ २५ जणांची उपस्थिती आणिी आरटी-पीसीआर तपासणी अनिवार्य केल्याने विवाह सोहळे पार पडणार की नाही, हे कठीणच आहे. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या संचालकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

अनेकांनी लग्नसोहळे रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मे महिन्यातील बुकिंग बहुतांश रद्द झाली आहे. लग्नकार्यासाठी आता आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कुणीही मंगल कार्यालयात लग्न करण्यास तयार नाही.- मंगल बल्की, चंद्रपूर 

गतवर्षी परिस्थिती सुधारेल या आशेवर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. पण आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेकांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यावरच संपूर्ण वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो.- स्वरीत पटेल, चंद्रपूर 

टॅग्स :marriageलग्न