शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेएवढ्या वीज निर्मितीसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: December 21, 2014 22:56 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा दुसरा संच तत्काळ बंद करणे व वीज उत्पादन क्षमता वाढविण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा दुसरा संच तत्काळ बंद करणे व वीज उत्पादन क्षमता वाढविण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले.विद्युत समन्वय समितीची आढावा सभा २० आॅक्टोबर रोजी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे जिल्हा सचिव राहुल सराफ, महाऔष्णीक केंद्राचे मुख्य अभियंता आर. पी. बुरडे, उपमुख्य अभियंता एस. बी. सोनी, उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे प्रकरणे १९८३ च्या शासन निर्णयाप्रमाणे मार्गी लावण्याचे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. कंपनीने सामाजिक दायित्त्व निधीतून प्रकल्पग्रस्त गावांचा विकास करावा, पॉवरप्लॉट पासून होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करावे, महाऔष्णिक विद्युत केंद्रात पुरवठा होणाऱ्या कोळशाची चोरी, अफरातफरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, जीपीएस प्रणालीचा वापर करण्याच्या सुचनाही यावेळी चर्चेदरम्यान ना. अहीर यांनी मुख्य अभियंता यांना दिल्या. खासगी सुरक्षा प्रहरी ऐवजी प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देवून नोकरीवर घेण्याची सुचनाही त्यांनी केली. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात जे ठेकेदार ३०-३१ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या सोयीच्या अटी व शर्तीनुसार टेंडर नोटीस काढले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर विद्युत नियामक मंडळात ६० लाखांपर्यंतची कामे सिव्हील इंजिनिअर बेरोजगार अभियंता यांना देण्याची कार्यवाही करावी, असेही ना. अहीर म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)