शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक साधनांमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: May 3, 2015 01:37 IST

प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे.

चंद्रपूर : प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधनं मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपारिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळते. पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .पूर्वीच्या काळी सुतार, लोहार, कुंभार यांना शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान होते. सुतार हा शेतीसाठी लागणारे वखर, नांगर, दरवाजे बनवून द्यायचे. आता हे साहित्य लोखंडी स्वरूपात मजबूत प्रकारात बाजारात मिळत असल्याने त्याचा परिणाम लोहार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. पारंपरिक पद्धतीने कातड्यावर प्रक्रि या करु न पादत्राणे तयार केली जायची. पद्धतीनुसार चपला, जोडे बाजारात उपलब्ध झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंभार मातीला एकजीव करून माठ, सुरई, पणत्या, रांजण तयार करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. आता या व्यवसायालादेखील उतरती कळा लागली असून या व्यवसायिकांना आता शासकीय मदतीची गरज व्यक्त केली जात आहे.बाजारपेठेत आधुनिक तंत्राचा व यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या साधनांनी शिरकाव केल्याने या पारंपरिक व्यावसायिकांनी बनविलेल्या साहित्याला आता विशेष मागणी नसते. त्यामुळे व्यवसाय डबघाईस आले आहेत. जागतिकीकरणात ग्रामीण भागातही या वस्तू सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रामीण भागात तर कुंभाराचे चाक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तप्त आगीत लोखंडाला आकार देवून ग्रामस्थांना पावशी, कुऱ्हाड, विळा तयार करणाऱ्या लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय बंदीचा बडगा आला आहे. या व्यावसायिकांना आता कामाच्या शोधात शहरात भटकंती करावी लागत आहे. त्यांना प्रशिक्षणातून तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास व्यवसायाला संजीवनी मिळेल. (प्रतिनिधी)