शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

By admin | Updated: November 11, 2015 00:42 IST

येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते.

गोवारी समाजाची प्रथा : चार गावांच्या सीमेवर होते आयोजनवतण लोणेघोडपेठयेथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही गोवर्धन पूजा येथील आदिवासी गोवारी समाजातर्फे आजही तितक्याच श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते.परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, मानोरा, मोहबाळा व इतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील ‘गो’ पाल आपल्या गायी गोवर्धन पूजेसाठी याठिकाणी घेवून येतात. अंदाजे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे, असे जाणकार सांगतात.भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी ही गावे घोडपेठ पासून उत्तरेस चार किमी अंतरावर आहेत. या गावांमध्ये बहुतांश आदिवासी गोवारी समाजाचे लोक राहतात. गायी राखणे हा गोवारी समाजाच्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. भगवान श्रीकृष्णाला आपले आराध्य दैवत मानणारे हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गाईंची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक पुजेसाठी गायींना गोवर्धन पूजा पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासून एक मोठी भुरसी बनविण्यात येते. गोवर्धन पुजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात.यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून एखाद्या सुवासिनीची ओटी भरतात, त्याप्रमाणे खणा नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते. यावेळी गोवारी समाजातील लोक आपापल्या ढालीचे पूजन करतात. २० ते २५ फूट लांबीच्या काठीवर लाकडी पाटा बसवून ढाल तयार केली जाते. ही ढाल गोवारी समाजाच्या ध्वजाचे प्रतीक असते. यानंतर गोवर्धन पूजेला सुरूवात होते.आदिवासी गोवारी समाजाच्या प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला ‘शिव बांधणे’ असे म्हणतात. त्यानंतर पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मूतीर्ची व नंतर आराध्य दैवत श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. पवित्र मंत्र म्हणून व नारळ फोडून भुरसीची पूजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणाऱ्या भुरसीवरून कळपाने गायींना सोडण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते. पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते. अंडे व पिल्लू यांना इजा होऊच शकत नाही असा येथील लोकांचा दावा आहे. त्यामुळे ही परंपरा येथील लोकांनी आजही कायम ठेवली आहे.