शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभाग आता पुन्हा होणार ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : राज्य सरकारने मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी सर्वसमावेश एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने बांधकाम परवानग्या ऑनलाईन ...

चंद्रपूर : राज्य सरकारने मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी सर्वसमावेश एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने बांधकाम परवानग्या ऑनलाईन देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून केलेली आॅटो डीसीआर प्रणाली कालबाह्य झाली आहे. मात्र विकासकामे खोळंबू नये, यासाठी राज्य सरकारने ऑनलाईनऐवजी ऑफलाईन परवानग्या देण्यात याव्या, यासाठी नगररचना विभागाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. मात्र ऑटो डिसीआर प्रणालीवर आजवर केलेला कोट्यवधींचा खर्च आता पाण्यात गेला आहे.

राज्य सरकारकडून नवीन डीसीपीआरसाठी आॅनलाईन प्रणाली येईपर्यंत आता आॅफलाईन प्रणालीच सुरू राहणार असल्याने नगररचना विभागासह विकासकामांमध्ये ''''''''''''''''नवचैतन्य'''''''''''''''' निर्माण झाले आहे. राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील बांधकाम परवानग्यांसाठी नवीन डीसीपीआर जाहीर केला आहे. यापूर्वी मोठया शहरासाठी स्वतंत्र डीसीपीआर जाहीर केला जात होता. त्यानुसारच बांधकामांना मंजुरी देण्यात येत होती. २०१७ मध्ये बांधकाम परवानग्या ऑफलाईन दिल्या जात होत्या. मात्र, २०१७ पासून राज्य सरकारने ऑटो डीसीआर संगणक प्रणालीच्या माध्यमातून परवानगी देणे बंधनकारक केले होते. त्यासाठी चंद्रपूर महापालिकेने आतापर्यंत मेंटनन्सपोटी लाखो रुपये मोजले आहे. २०१७ पासून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी पाच वर्षांचा करारही करण्यात आला. परंतु, नगररचना विभागातील अधिकारी आणि काही विकासकामांनी या प्रणालीत अनेक अडथळे आणले. त्यामुळे कधी आॅफलाईन तर कधी आॅनलाईन कामे सुरू राहिलीत. या प्रणालीसाठी महापालिकेने संबंधित कंपनीला लाखो रुपये अदा केले आहेत. नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याने या प्रणालीवर अनेकदा आक्षेप घेण्यात आला. तांत्रिक अडथळ्यामुळे बांधकामाच्या परवानगी अडकल्या होत्या.

बॉक्स

वादग्रस्त परवानग्या लागणार मार्गी

ऑटो डिसीआर प्रणाली २०२२ पर्यंत कार्यान्वित राहणार होती. परंतु, आता ही प्रणालीच गुंडाळून ठेवण्यात आली आहे. सरकारकडून पुढील तीन महिन्यात नवीन नियमांचा समावेश असलेले सॉफ्टवेअर आणले जाणार असल्याने तोपर्यंत आॅफलाईन पद्धतीने बांधकामाच्या परवानग्या दिल्या जाणार आहेत. आफलाईन पद्धतीमुळे यापूर्वी तांत्रिक मुद्यांमध्ये अडकलेली प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

कोट

नगररचना विभागात कार्यरत असलेली ऑटो डिसीआर प्रणाली आता बंद आहे. नवीन डिसीआर प्रणाली येतपर्यंत ऑफलाईन पध्दतीने कामे करावीच लागणार आहे. शासन त्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे.

-राजेश मोहिते, आयुक्त,

चंद्रपूर महानगरपालिका.