तंबाखुजन्य पदार्थाने कर्करोगाचा धोका

By Admin | Updated: March 25, 2015 01:28 IST2015-03-25T01:28:19+5:302015-03-25T01:28:19+5:30

ग्रामीण भागातील जिवनशैली, लोकांचे वेसन, मुखाचे वाढते आजार, तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे वाढत चाललेले व्यसन यातून मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.

Tobacco products contain cancer risk | तंबाखुजन्य पदार्थाने कर्करोगाचा धोका

तंबाखुजन्य पदार्थाने कर्करोगाचा धोका

चंद्रपूर: ग्रामीण भागातील जिवनशैली, लोकांचे वेसन, मुखाचे वाढते आजार, तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे वाढत चाललेले व्यसन यातून मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय व मौखिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक मौखिक आरोग्य दिन सप्ताह सुरु आहे. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या निमित्ताने मौखिक आरोग्याबद्दल शालेय विद्यार्थी व गरोदर महिलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये मौखिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली.
मुलांसाठी ब्रश करण्याची योग्य पद्धत, निबंध स्पर्धांमार्फत जनजजागृती केली जाणार असून गरोदर मातांसाठी विशेष प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली जाणार आहे. यावर्षी जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे घोष वाक्य ‘स्माईल फॉर लाईफ’ असे आहे. व्यक्तीने जिवनात सतत आनंदीत व हसत राहावे. त्यामुळे सकारात्मक वैचारिक दृष्टीकोन निर्माण होवून व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होते. या कार्यक्रमात लोकांना मुख व दन्त आरोग्य विषयी माहिती देवून लोकांना जागृत करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून दंत रोगतज्ज्ञ डॉ. संदीप पिपरे यांनी मुखाची व दाताची रचना, मुख व जागतिक मुख आरोग्य दिन सप्ताह शिबिराचे आयोजन करुन लोकांना जागृत करुन उपचार देवू असे सांगितले. नागरिकांना मुखाचे आरोग्य विषयी असलेले अज्ञान आणि बदल्यात सवयीमुळे आजाराचे वाढते प्रमाण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सप्ताह निमित्ताने वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करुन उपचार सेवा देण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी दिले. आभार जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सोना देशमुख यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Tobacco products contain cancer risk