नगरसेवकाची लिपिकाला जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:49+5:30

या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

Threat to kill councilor clerk | नगरसेवकाची लिपिकाला जिवे मारण्याची धमकी

नगरसेवकाची लिपिकाला जिवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना निवेदन : चिमूर नगर परिषदेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : नगर परिषद स्वच्छता विभागात कार्यरत लिपिक प्रवीण कारेकर यांना प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक सतीश जाधव यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी फोन करून जेसीबीची मागणी केली. लिपिक कारेकर यांनी दोन दिवसानंतर जेसीबी देऊ असे सांगताच नगरसेवकांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
यापूर्वी नगरसेवक सतीश जाधव यांनी लिपिक प्रवीण कारेकर यांच्यासोबत तोंडी बाचाबाची केली होती. तसेच इलेक्ट्रिक विभागातील कर्मचाºयांसोबत सुध्दा अश्लिल वर्तन करून शिविगाळ केली होती. त्यामुळे जाधव यांच्यावर नगरपरिषदतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्या काळ्या फिती लावून नगरसेवकांचा निषेध केला. निवेदन देताना हरिचंद्र डांगे, मिनाज शेख, संजय सेलोकर, प्रवीण कारेकार, शरद पाटील, अधीक्षक चौगुले, हेमंत राहुलवार, सुमित मेश्राम, स्नेहल दाबेकर, विलास चौखे आदी उपस्थित होते.

संबधित कर्मचाºयाला २० दिवसांपूर्वी प्रभागातील काम करायला सांगितले होते. मात्र ते काम केले नाही. त्यामुळे त्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी खोटा आरोप केला आहे.
- सतीश जाधव,
नगरसेवक, नगर परिषद चिमूर

Web Title: Threat to kill councilor clerk