शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करा

By admin | Updated: September 6, 2016 00:41 IST

शहरातील महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात एका प्राध्यापकाने कॅमेरा लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिवसेनेची मागणी : व्यवस्थापनाची नाममात्र कारवाईवरोरा : शहरातील महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात एका प्राध्यापकाने कॅमेरा लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवस्थापनाने नाममात्र कारवाई केली. हा प्रकार घृणास्पद असल्याने या प्राध्यापकावर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने वरोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली.वरोरा शहरातील आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने मुलींच्या स्वच्छता गृहात छुपा कॅमेरा लावण्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सदर प्राध्यापकाचा हा लांछनास्पद प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. कॅमेऱ्यामध्ये अनेक महाविद्यालयीन युवतींचे छायाचित्र असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. सदर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने या प्राध्यापकावर नाममात्र कारवाई केली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आणि फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिवसेनेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कामगार सेना प्रमुख मनोज दानव, नगरसेवक राजू महाजन, राहुल ढेंगणे, दिनेश यादव, बंडू देऊळकर, त्रिसन रासेकर, प्रफुल्ल नामे, बंटी चौधरी, आशिष रुयारकर, सन्नी गुप्ता, पंकज माधव, अक्षय रासेकर, भुवनेश्वर मेश्राम, सलीम शेख आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)प्राध्यापकाला निलंबित करा; भाजपही मैदानातमुलींच्या स्वच्छतागृहात स्वत: प्राध्यापकाने पेन कॅमेरा लावला. हा प्रकार महाविद्यालयीन युवतीच्या लक्षात आल्यानंतर तो कॅमेरा प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्राध्यापकाला निलंबित करा अथवा राजीनामा द्यावा लागला असला तरी घडलेला प्रकार निंदनीय आहे. विद्यार्थ्यांसोबत पवित्र नाते समाजाला अभिप्रेत आहे. शाळा महाविद्यालय शिक्षणाकरिता आपल्या पाल्याला पालक पवित्र मंदिर म्हणून पाठवित असतात शिक्षकाच्या हाती मुलांचे भविष्य व जडणघडण असते. त्यात असा प्रकार घडल्यास समाजात त्याचा विपरित परिणाम होत असतो सदर प्रकार निंदनीय व घृणास्पद आहे. हे कृत्य करणाऱ्या प्राध्यापकावर कठोर कारवाई गरजेचे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.उद्या महाविद्यालय बंदशिवसेना वरोरा शहराच्या वतीने ‘त्या’ प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर बुधवार ७ सप्टेंबर रोजी महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा शिवसेना वरोरा शहर प्रमुख नीलेश भालेराव यांनी दिला आहे.