शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात बचत गटांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे.

ठळक मुद्देमहिलांना मास्क बनविण्याचे काम : मूल नगरपालिकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे हातावर घेऊन पानावर खाणाऱ्या कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा कुटुंबाला आधार देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या पुढाकाराने महिला बचत गटातील महिलांना माक्स बनविण्याचे काम देण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात बचत गटातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. शहरात माक्सचा तुटवडा पडू नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे.महिला सक्षम बनली पाहीजे हा हेतू नगरपरिषदेचा असल्याने मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी स्वत: पुढाकार घेऊन सन. २०१९-२० या आर्थिक वर्षात न.प.फंडातून पाच टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आला. मूल शहरातील ८९ दिव्यांगाना प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये त्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात करण्यात आले. या रक्कमेचा उपयोग महिला बचत गटाच्या महिलांनी कापडी मॉक्स तयार करण्याचा उद्योग सुरू केला. आदर्श वस्ती स्तर संघ, संस्कार वस्ती स्तर संघ, लक्ष्मी महिला बचत गट या बचत गटातील महिलांनी माक्स तयार केले. कोरोना विषाणूच्या परिणामाने सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे आजही बाहेर पडणे म्हणजे कोरोनाला जवळ घेणे आहे ही भीती सर्वत्र असल्याने घराबाहेर पडण्याची हिंमत केली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने घरच्या घरी कापडी माक्स शिवण्याचे काम देऊन एक प्रकारे फार मोठा आधार दिल्याचे दिसून आले.नगरपरिषद प्रशासन सतत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने मजूरी करणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावला गेला. हे हेरून नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटाच्या महिलांना मॉक्स बनविण्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात महिलांना फार मोठा आधार मिळाला आहे.- रितेश भोयर, प्रकल्प अधिकारी, न.प.मूल

टॅग्स :Socialसामाजिक