शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंत्याचा दोन शासकीय निवासस्थानांवर ताबा

By admin | Updated: March 27, 2015 00:53 IST

येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंता एस.सी. तव्वर यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.

वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंता एस.सी. तव्वर यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. तव्वर यांचे गोंडपिपरी येथील मुख्यालयासह चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानावरही ताबा आहे. एकाच अधिकाऱ्याला दोन शासकीय निवासस्थाने दिलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयात पाळलेले ‘मौन’ संशय निर्माण करणारे आहे. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही उपअभियंता तंव्वर यांना ‘अभय’ असल्याची बाब स्पष्ट होत आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उपअभियंता तव्वर हे गोंडपिपरी उपविभागाला उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी त्यांचे चंद्रपूर येथे सहकुटुंब वास्तव्य होते. सध्या ते नागपुरात वास्तव्याला आहेत. प्राप्त माहितीनुसार, एस.सी. तव्वर हे चंद्रपुरात कार्यरत असताना त्यांना वास्तव्याच्या सोयीसाठी शासकीय निवासस्थान देण्यात आले. मात्र त्यांची चंद्रपूर येथून गोंडपिपरी येथे बदली झाली. गोंडपिपरी येथे रूजू होवून तव्वर यांनी येथील निवासस्थानाचा ताबा घेतला. तव्वर यांचे सद्याचे मुख्यालय गोंडपिपरी हे असल्याने गोंडपिपरी येथील निवासस्थानावरील ताबा हा अधिकृत असला तरी त्यांचा चंद्रपूर येथील शासकीय निवासस्थानावरील ताबा हा गैरकायदेशीर असल्याबाबतची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.एकाच उपअभियंत्याने तब्बल वेगवेगळ्या दोन निवासस्थानांवर ताबा मिळविल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाअभावी किरायाने रहावे लागत असून दोन निवासस्थानांचा ताबा घेणारे तव्वर हे दोन्ही निवासस्थानात केवळ एक ते दोन दिवस राहून उर्वरित दिवस नागपूर येथे घालवित असल्याची माहिती आहे. एकीकडे तालुक्यात तव्वर यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरू असताना दोन निवासस्थानांवरील ताब्यामुळे तव्वर यांचा हा प्रताप नागरिकांना आश्चर्यात टाकणारा असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.