विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:02:03+5:30

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे.

Students will get grain in packing | विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : ३४ दिवसांचा सोय होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद झाल्या. दरम्यान, शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताच आला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून शिल्लक धान्याचे वितरण केले. दरम्यान, आता उन्हाळ्यातील ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना पॅकींगच्या स्वरुपात देण्याच निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून संबंधितांना यासंदर्भात निर्देश दिले आहे.
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे. त्यामुळे शिक्षणसंचालकांना पुरवठादारांसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार पॅकींगच्या स्वरुपात विद्यार्थ्यांंना वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकाºयांना यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्राप्त झालेले धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांना घ्यावी लागणार आहे.

मुख्याध्यापकांचे वाढणार टेंशन
सुटी कालावधीतील धान्य वितरण करण्यासाठी मुख्याध्यापकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. अनेक नियम पाळावे लागणार असून नोंदी घ्यावी लागणार असल्याने मुख्याध्यापकांचे टेंशन वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्राप्त झालेले धान्य शाळांत सुस्थितीत ठेवायचे असून कंत्राटदाराकडून योग्य वजन करून घ्यावे लागणार आहे. सोबतच शालेय व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनालाही माहिती कळवावी लागणार आहे.

दर्जाचीही करावी लागणार तपासणी
धान्य प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या गोदामामध्ये गटशिक्षणाधिकाºयांना जावे लागणार असून तिथे धान्याचा दर्जा तपासावा लागणार आहे. एवढेच नाही तर धान्य तसेच पॅकींगसंदर्भात मुख्याध्यापक समाधानी नसल्याने धान्य बदलवून मिळणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार ५ दिवसांच्या आत स्वखर्चाने कंत्राटदाराला धान्य पुरवठा करावा लागणार आहे. सोबतच गावातील लोकप्रतिनिधांना माहितीही द्यावी लागणार आहे.

Web Title: Students will get grain in packing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.