शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना घरीच मिळत आहे पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू (कोविड-१९) चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळा व अंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे सुमोटो रिट याचिका दाखल झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा परिणाम : बंदीतही विद्यार्थ्यांचे होणार पोषण

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळ, कडधान्य विद्यार्थ्यांना थेट वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.याबाबत नुकतेच शासनाने परिपत्रक काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत शासनाने पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. तसेच, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.कोरोना विषाणू (कोविड-१९) चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळा व अंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे सुमोटो रिट याचिका दाखल झाली आहे. उक्त याचिकेच्या अनुषंगाने १८ मार्च रोजीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि याबाबत केंद्र शासनाकडून घेण्यात आलेले मार्गदर्शन विचारात घेता राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळ, कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याकरिता निर्देश देण्यात येत आहेत.तांदूळ व डाळी, कडधान्य वाटप करतेवेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घ्यावयाच्या खबरदारीबाबत दिलेले आदेश व सूचनांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच वाटपाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.गर्दी होणार नाही याची दक्षतातांदूळ व डाळी, कडधान्य वस्तू नेण्यासाठी शाळास्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक यांना टप्याटप्याने शाळेमध्ये बोलवावे. तांदूळ व डाळी, कडधान्य इत्यादी वस्तूचे वाटप करावे. उपस्थित असणारे विद्यार्थी, पालक यांना एकमेकापासून रांगेत एक मीटर अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ व डाळी, कडधान्य घरपोच करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.शिक्षकांवर जबाबदारीशाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तांदूळ व डाळी, कडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी, कडधान्य वाटपाबाबत शाळास्तरावरून प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी